शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

मेधा लोकल धावली!

By admin | Published: March 19, 2017 2:04 AM

पश्चिम रेल्वे मार्गावर स्वदेशी बनावटीची पहिली मेधा लोकल सुरू करण्यात आली. लोकलमधील संपुर्ण विद्युत यंत्रणा भारतीय तंत्रज्ञांनी बसविलेली आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर स्वदेशी बनावटीची पहिली मेधा लोकल सुरू करण्यात आली. लोकलमधील संपुर्ण विद्युत यंत्रणा भारतीय तंत्रज्ञांनी बसविलेली आहे. मेधा लोकल दादर ते बोरीवली धिम्या मार्गावर दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी रवाना करण्यात आली.‘तेजस’ ट्रेन येत्या काही दिवसांमध्ये तर ‘उदय’ ट्रेन मे महिन्यात प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. रेल्वे संबंधीच्या विविध सोईसुविधांचे उद्घाटन शनिवारी प्रभू यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. कुर्ला पूर्वेकडील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान, अंत्योदय एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानंतर, व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे इतर सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.सुरेश प्रभू या वेळी म्हणाले की, देशातील प्रत्येक स्थानकावर डिजिटल डिस्प्ले लावण्यात येणार आहेत. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ४० हजार कोटींची आर्डर देण्यात आली आहे. आयात कमी करण्यासह देशांतर्गत निर्मितीवर जास्त भर देण्यात येणार आहे. विशेषत: साडे तीन लाख कोटींची गुंतवणूक रेल्वेमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी २२ हजार २६७ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्यात आली आहे. राज्यात सद्यस्थितीमध्ये १ लाख ३७ हजार लाख रुपयांपेक्षा अधिक निधीचे प्रकल्प सुरू आहेत. मुंबई शहरासाठी ५१ हजार कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)नगर-परळी रेल्वे लाइनच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णनगर-बीड-परळी या बहुप्रतीक्षित रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, नगर ते नारायणडोहो या १० किलोमीटरच्या थांब्यापर्यंत सात डब्यांची रेल्वे शुक्रवारी धावली. याच मार्गावरील बुरुडगाव रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पणही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या वेळेस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.नगर-परळी या सुमारे २५० किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. १४०० कोटींहून अधिक खर्चाच्या या कामास पाच वर्षांपासू गती मिळाली आहे. राज्य सरकारने चालू अर्थसंकल्पात त्यासाठी ४९ कोटींची तरतूद केली आहे. नगर ते नारायणडोहो या पहिल्या १० किमीचे काम पूर्ण झाले. मागील महिन्यात या मार्गादरम्यान रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली. गेल्या आठवड्यापासून या मार्गावर सात डब्यांची रेल्वे धावण्याची चाचणी घेण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गावरील पूल, भराव, क्रॉसिंग, तसेच तांत्रिक बाबींची पाहणी केली.