शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

महाराष्ट्रातील रँकवर वैद्यकीय प्रवेशाचे गणित अवलंबून, कॅटेगिरी रँकिंगही महत्त्वाची 

By अविनाश कोळी | Published: June 18, 2024 12:51 PM

अन्य राज्यांतील प्रवेशाचे मार्गही मोकळे

अविनाश कोळीसांगली : दीड हजारावर विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्क रद्दमुळे वैद्यकीय प्रवेशातील ऑल इंडिया रँकमध्ये फार काही फरक पडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी आता स्टेट मेरीट लिस्टवर विसंबून आहेत. आरक्षित प्रवर्गानुसार लागणाऱ्या स्वतंत्र रँकमुळेही विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो, असे मत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशकांनी व्यक्त केले आहे.‘नीट’च्या परीक्षेत यंदा अनेक गैरप्रकार घडल्याने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यंदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पेपरफुटीसह विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याच्या मुद्द्यावर अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे केंद्र सरकार व राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने १३ जून रोजी १५६३ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांची २३ जूनला फेरपरीक्षा घेण्यात येऊन त्याचा निकाल ३० जूनला जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर १८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत काय निर्णय होणार, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

ग्रेस मार्क रद्दमुळे फार परिणाम नाहीवैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक डॉ. परवेज नाईकवाडे यांनी सांगितले, ‘नीट’ची फेरपरीक्षा सध्यातरी १५६३ विद्यार्थ्यांचीच होणार आहे. त्यामुळे ऑल इंडिया रँकमध्ये फारसा फरक पडणार नाही. मेडिकल कौन्सिलिंग कमिटीमार्फत घेतल्या जाणाऱ्या ऑल इंडिया कोट्यासाठीचा कटऑफ गतवर्षीच्या तुलनेत खूप जास्त राहणार, हे नक्की आहे.

महाराष्ट्रातील कॅटेगिरी रँक महत्त्वाचीमहाराष्ट्राच्या कोट्यातून प्रवेशासाठी विद्यार्थी अर्ज करतील तेव्हा सीईटी-सेलमार्फत या सर्व अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाईल. स्टेट मेरीट लिस्टमधील विद्यार्थ्याचा क्रमांक महाराष्ट्रातील प्रवेशासाठी महत्त्वाचा आहे. एनटीबी, एनटीसी, एनटीडी तसेच विमुक्त जाती-अ हे प्रवर्ग राष्ट्रीय स्तरावर इतर मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गात येत असले तरी महाराष्ट्रात या प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांची कॅटेगिरी रँकदेखील महत्त्वाची ठरणार आहे.

प्रवेशाचा रस्ता या गोष्टींवर अवलंबूनयावर्षी राज्यात किती नवीन महाविद्यालये सुरू होतात आणि किती जागा वाढतात तसेच ऑल इंडिया कोट्यातून महाराष्ट्रातील किती विद्यार्थी प्रवेश घेतात, किती विद्यार्थी रिपीट करतात, या सर्व बाबींवरूनच महाराष्ट्राचा कटऑफ निश्चित होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता न करता प्रवेश फेरीत सहभागी होणे आवश्यक आहे, असे डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले.

ऑल इंडिया रँकमध्ये असा पडला फरकगुण -२०२३ -२०२४ -फरक७२० - २  - ६७ - ६५६९० - ९०१ -४८४२ - ३९४१६६० - ४८५४ - २१०६७ - १६२१३६३० - १४१८४ - ४८७२२ - ३४५३८६१८ - १९४६९ - ६०५०० - ४१०३१५८५ - ३८६१८ - ९८१२७ - ५९५०९५२० - ९०२१० - १८०९१२ - ९०७०२४०५ - २२३९९४ - ३६९६१४ - १४५६२०

टॅग्स :SangliसांगलीMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थी