मुंबई : वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल गुरुवारी संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. निकालाची वेळ ठरविण्यात आली नसून, दिवसभरात कोणत्याही क्षणी निकाल जाहीर होऊ शकेल, असे संचालनालयातील सूत्रंनी सांगितले. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी संचालनालयाने 8 मे रोजी परीक्षा घेतली होती. राज्यभरातील 1 लाख 48 हजार 397 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यामध्ये मुंबईतून 16 हजार 238 विद्याथ्र्याचा समावेश होता. परीक्षेत विद्याथ्र्याना मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. विद्याथ्र्याकडून प्राधान्य अर्ज भरून घेतल्यानंतर विद्याथ्र्याना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे.
वैद्यकीय सीईटीचा आज निकाल
By admin | Published: June 05, 2014 1:58 AM