मुंबई : राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना शुल्क नियंत्रण समितीने (एफआरए) सरासरी २५ टक्क्यांपर्यंत शुल्कवाढीस परवानगी दिली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे येथील १६ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे शुल्क सरासरी २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढेल.पालकांमध्ये नाराजी शुल्क नियंत्रणात आणण्याऐवजी शुल्कवाढ झाल्याने पालक नाराज आहेत. त्यांच्यावर आर्थिक ताण वाढेल. कर्नाटकसारखी राज्ये समान शुल्क आकारणी प्रक्रिया राबवित असताना, तीच प्रक्रिया महाराष्ट्रात का राबवित नाही, असा प्रश्न पालकांनी केला.महाविद्यालय आधीचे शुल्क नवीन शुल्कके. जे. सोमैया मेडिकल कॉलेज, मुंबई ७,५०,००० ९,२५,०००तेरणा मेडिकल कॉलेज, नेरूळ, नवी मुंबई ५,६१,००० ७,००,०००डॉ. वसंंतराव पवार मेडिकल कॉलेज, नाशिक ६,२५,००० ७,००,०००एसीपीएम मेडिकल कॉलेज, धुळे ५,००,००० ५,२०,०००एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट, नागपूर ७,८५,००० ८,८३,०००पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती ७,१५,००० ८,१२,०००एमआयएमएसआर मेडिकल कॉलेज, लातूर ६,००,००० ७,००,०००डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज, नगर ६,९५,००० ७,३७,०००काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे १२,००,००० १२,६०,०००
वैद्यकीय शिक्षण महागणार; सरासरी २५ टक्के फी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 6:26 AM