शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

वैद्यकीय परीक्षा ठरलेल्या वेळेत; मंत्री अमित देशमुख यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 7:14 AM

उस्मानाबाद जिल्ह्याची अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची असलेली मागणी पूर्ण

उस्मानाबाद : राज्यातील वैद्यकीय परीक्षेबाबत आता कोणताही संभ्रम राहिलेला नाही. ठरलेल्या वेळेतच या परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी उस्मानाबाद येथे दिली.उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री अमित देशमुख हे सोमवारी सायंकाळी आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, वैद्यकीय परीक्षा या लवकरच आणि ठरलेल्या वेळेतच घेणार आहोत. त्याची तयारीही जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे अडचणी येणार नाहीत. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्याची अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची असलेली मागणी पूर्ण करण्यात आली आहे. आगामी वर्षापासूनच येथे हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेतच सुमारे १० हेक्टर ८१ आर क्षेत्रफळाची जागा उपलब्ध झालेली असून, महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने पदांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक यंत्रणेने येथील व्यवस्था पूर्ण कराव्यात, अशी सूचना करतानाच, उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून चांगले डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञ तयार व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी खा. ओम राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची उपस्थिती होती.