शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

जळगावमध्ये मेडिकल हब

By admin | Published: April 26, 2017 1:42 AM

जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (हब) उभे करण्यात येणार असून, त्यासाठी १ हजार २५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

मुंबई : जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (हब) उभे करण्यात येणार असून, त्यासाठी १ हजार २५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण, तसेच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होणार आहेत. जळगाव-जामनेर मार्गावर जळगावपासून ५ किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे हे भव्य संकुल उभारले जाणार आहे. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, होमिओपॅथी, भौतिकोपचारशास्र आणि नर्सिंग महाविद्यालय उभारण्यात येईल. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबतची माहिती पत्र परिषदेत दिली. या संकुलामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय यांचा समावेश आहे. शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल उभारणीसाठी ४६.५६ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रुग्णालयासह एकूण १२ एकर जागा सदर वैद्यकीय संकुल स्थलांतरित होईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागास हस्तांतरित करण्यासदेखील मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)