लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी शनिवारपासून विद्यार्थ्यांना आॅनलाइन पसंतीक्रम अर्ज भरता येणार आहेत. त्यासोबतच कागदपत्रांची पडताळणीही करावी लागणार आहे. त्यासाठी दि. २१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पडताळणी अथवा पसंती अर्ज न भरल्यास संबंधित विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत, असे राज्य सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.राज्यातील एमबीबीएस, बीडीएससह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी सीईटी कक्षामार्फत आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी दि. १० जुलैपर्यंत आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे तात्पुरती राज्य गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत ५० हजार ६२३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नियोजित वेळापत्रकानुसार दि. २४ ते २७ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना आॅनलाइन पसंतीक्रम अर्ज भरता येणार होते. मात्र, या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून सुधारित वेळापत्रकानुसार दि. १५ ते २१ जुलैदरम्यान पसंतीअर्ज भरावे लागणार आहेत. तसेच याच कालावधीत कागदपत्रांची पडताळणीही करून घ्यावी लागणार आहे. त्यानुसार प्रवेशाची पहिली निवड यादी दि. २५ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. यादीतील विद्यार्थ्यांना दि. ३१ जुलैपर्यंत संबंधित संस्थेत प्रवेश घेता येईल.>प्रवेशास मुकावे लागेलकागदपत्रांच्या पडताळणीसाठी चार केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. आॅनलाइन पसंतीक्रम अर्ज न भरणाऱ्या व कागदपत्रांची पडताळणी केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांना प्रवेशास मुकावे लागेल, असे कक्षाने स्पष्ट केले़
वैद्यकीयसाठी पसंतीक्रम भरता येणार
By admin | Published: July 15, 2017 4:49 AM