शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

‘नीट’मुळे मेडिकलच्या जागा रिक्त राहणार

By admin | Published: May 16, 2016 1:55 AM

(नीट) परीक्षेत ७२० गुणांपैकी ३६० गुणांपेक्षा अधिक मिळविणारे उमेदवारच मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.

पुणे : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रान्स टेस्ट (नीट) परीक्षेत ७२० गुणांपैकी ३६० गुणांपेक्षा अधिक मिळविणारे उमेदवारच मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. दोन महिन्यांत नीट परीक्षेचा अभ्यास करून राज्यातील विद्यार्थ्यांना ३६० गुण मिळणे अवघड जाईल. परिणामी, राज्यातील मेडिकल प्रवेशाच्या जागा रिक्त राहतील, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यातील विद्यार्थी हुशार असल्याने प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.केंद्रीय मध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार मेडिकल अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार आहे. गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून नीट परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ७२० गुणांपैकी ३६० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवतील. मात्र, राज्य मंडळाच्या केवळ बारावीच्या अभ्यासक्रमाच्या आधारे सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत अभ्यास करून ३६० गुण मिळवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घ्यावे लागतील. तेव्हाच राज्यात मेडिकल प्रवेशाच्या एकूण ६ हजार ५०० जागा भरल्या जातील. सीबीएसईतर्फे २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या नीट परीक्षेला राज्यातून १ लाख ३४ हजार ४४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ९६ हजार ५४६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. या परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. त्यामुळे २०१३ च्या नीट परीक्षेत ७२० गुणांपैकी ९८ गुण मिळवून मेडिकल प्रवेशासाठी ३३ हजार ९६४ विद्यार्थी पात्र ठरले होते. मात्र, यंदा मेडिकल सीईटी परीक्षेसाठी राज्यातील सुमारे २ लाख ८० हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून त्यांनी राज्य मंडळाचा केवळ बारावीचा अभ्यास केला आहे. आता त्यांना सीबीएससी बोर्डाचा अकरावी आणि बारावी या दोनही वर्षाचा अभ्यासक्रम दोन महिन्यात पूर्ण करायचा आहे. त्यातच ७२० पैकी ३६० गुण मिळवायचे आहेत. राज्यातील विद्यार्थी एवढे गुण मिळवू शकतील का? याबाबत शंका व्यक्त होत आहे. >२०१३ च्या ‘नीट’साठी जून २०१२ मध्येच कोणता अभ्यास करावा, हे स्पष्ट केले होते. आता २ महिन्यांतच अभ्यास करावा लागेल. यंदा उत्तीर्ण होण्यासाठी ५० % गुण लागतील. २०१३ मध्ये १३ % गुण मिळवावे लागले होते. त्यामुळे राज्यातील जागा रिक्त राहू शकतात.- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र>विद्यार्थी ७२० पैकी ३६० गुण मिळवतील, याबाबत शंका नाही. कमी गुण मिळाल्यास गरज भासल्यास ५ ते १० गुणांनी कट आॅफ खाली घेता येऊ शकतो. मात्र, २०१३ च्या नीट परीक्षेचा अनुभव विचारात घेता कट आॅफ खाली घेण्याची वेळ येणार नाही. -प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय