रुग्णसेवा प्रभावित : सलाईन, स्पिरिटचे बिल थकल्याने पुरवठा बंदसुमेध वाघमारे - नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अनेक अतिशय महत्त्वाची औषधे उपलब्ध नाहीत. यातच मागील दोन महिन्यांपासून सलाईन, २१ दिवसांपासून एक्स-रे फिल्म तर आता स्पिरीटचाही तुटवडा पडला आहे. परिणामी, बाह्यरु ग्ण व आंतररु ग्ण विभागातील गोरगरीब रु ग्णांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे औषध पुरवठादारांचे बिल थकल्याने पुरवठा ठप्प पडला आहे. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात औषधांच्या नावाने ठणठणाट आहे. गोरगरीब रुग्णांना पदरमोड करून औषधांची खरेदी करावी लागत आहे. मेडिकलच्या बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागात दररोज दोन हजारावर रुग्ण विविध भागातून येतात. यामध्ये संपूर्ण विदर्भासह, मध्य प्रदेश, छत्तीसगड या शेजारच्या राज्यांचाही समावेश आहे. यातील अनेकांना आंतररु ग्ण विभागात दाखल केले जाते; तसेच ओपीडीच्या वेळेनंतर दिवसा व रात्रभर रु ग्णांचा मोठ्या प्रमाणावर ओघ सुरूच असतो. ओपीडीमध्ये तपासणी झाल्यानंतर लिहून दिलेली निम्मी औषधे औषधालयातून मिळत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारची प्रतिजैविकांसाठी तर थेट बाहेरचाच रस्ता दाखविला जातो. आकस्मिक विभागात तर अपघातग्रस्त किंवा अनोळखी व्यक्ती आल्यास त्याचे नातेवाईक येईपर्यंत त्याच्यावर औषधोपचार थांबविला जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.दोन महिन्यांपासून सलाईनची प्रतीक्षामेडिकलला दिवसभरात विविध प्रकारच्या सुमारे हजार सलाईन लागतात. तब्बल दोन महिन्यापासून सामान्य प्रकारातील सलाईन नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना सलाईन खरेदी करून आणावी लागत आहे. अनेक रुग्ण पैशांची मदत होईपर्यंत ताटकळत राहत आहेत. सामान्य सलाईनसोबतच अति गंभीर रुग्णांना, अपघातग्रस्त रुग्णांना देण्यात येणाऱ्या सलाईनचाही तुटवडा पडला आहे. स्पिरिटसाठी धावाधावमेडिकलच्या आकस्मिक विभागापासून ते वॉर्डापर्यंत स्पिरीटचा तुटवडा पडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांसोबतच डॉक्टरांची धावाधाव वाढली आहे. औषध भांडारात स्पिरीटचा फार कमी साठा शिल्लक असल्याने आवश्यक असल्यावरच ते उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, दोन आठवड्यापासून नवीन साठा मिळाला नसल्याची माहिती आहे. पुरवठा खंडित, खरेदीला मर्यादा मेडिकलला औषध व साहित्याचा पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यांचे पैसे थकल्याने दरपत्रकावरील (रेट कॉन्ट्रॅक्ट) कंपन्यांनी पुरवठा करणे थांबवल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे रेट कॉन्ट्रॅक्टची मुदतवाढ संपली आहे. याचवेळी स्थानिक खरेदी ही दिवसाला काही हजारांपेक्षा जास्त करता येत नाही. यामुळे समस्या आणखी बिकट झाली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सलाईन पुरवठादाराचे २९ लाखांचे बिल थकल्याने त्याने पुरवठा थांबविला आहे.स्पिरिट पुरवठादाराचे कोट्यवधीचे बिल थकीतराज्यात संपूर्ण शासकीय रुग्णालयाला स्नेहल एन्टरप्राईजेसकडून स्पिरीटचा पुरवठा होतो. या एन्टरप्राईजेसचे कोट्यवधीचे बिल थकल्याने या कंपनीकडून मागणीच्या तुलनेत फार कमी पुरवठा होत असल्याची माहिती आहे. मेडिकलमध्ये आठवड्यापासून स्पिरीटचा तुटवडा पडला असला तरी मागील दिवसांपासून स्थिती बिकट झाली आहे.
मेडिकलचे ‘स्पिरिट’ हरवले!
By admin | Published: January 12, 2015 1:02 AM