लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : औषध विक्रेता संघटनांशी चर्चा करण्यास सरकार तयार आहे. पण आॅनलाईन पद्धतीने औषधे विकण्यासंबंधीचा कायदा अद्याप लागू न झाल्याने त्याविरोधात औषध विक्रेता संघटनांनी पुकारलेला एक दिवसाचा बंद अनावश्यक होता, अशी टीका अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी केली. पत्रपरिषदेत त्यांनी दावा केला की, मंगळवारच्या बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, भविष्यात आॅनलाईन औषध विक्रीची पद्धतच महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र सरकारने आॅनलाइन पद्धतीने औषधविक्री करण्याबद्दल कायदा करण्याचे ठरविले आहे. त्याला विरोध करण्यासाठी राज्यातील औषध विक्रेत्यांनी एक दिवसाचा बंद पुकारला होता. त्या संदर्भात माहिती देताना बापट म्हणाले, बंद मोडून काढण्याचे सरकारचे धोरण नाही. उलट येऊ घातलेल्या कायद्याच्या संदर्भात सहमतीने निर्णय घेणे, असे सरकारचे धोरण आहे. नवा कायदा करताना लोकांच्या तसेच संबंधितांच्या हरकती-सूचना विचारात घेऊनच कायदा बनविला जातो. कायदा अद्याप झाला नसताना औषध विक्रेत्यांचा बंद अनाठायी आहे, असा आरोप बापट यांनी केला.बंदला मोठ्या प्रतिसादाचा दावाऔषध विक्रेत्यांच्या बंदला राज्यात सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आमच्या विविध ठिकाणच्या प्रतिनिधींनी कळविले आहे. विदर्भात तर शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने केला आहे.
औषधांची विक्री होणार आॅनलाइन
By admin | Published: May 31, 2017 3:22 AM