राजरत्न सिरसाट / अकोलाप्राण्यांच्या शरीरातील जो अवयव दुखत असेल नेमक्या त्याच (नॅनो टेक्नॉलॉजी डेव्हलप ड्रग्स फार्म्युलेशन) अवयवावर आता औषधाची मात्रा लागू होणार आहे. महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) मुंबई येथील व्हेटरनरी कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे. या संशोधनाचे चांगले परिणाम समोर आले आहेत.प्राण्यांना आजार किंवा अवयवावर परिणाम झाला असेल, त्यासाठी औषधे दिली जातात; परंतु ही नेमक्या अवयवावर उपचार करण्याऐवजी शरीरात सर्वत्र पसरली जातात. नेमके ज्या ठिकाणी दुखणे आहे, त्याच भागाला मात्र औषधाचा कमी पुरवठा होतो. शरीरातील ज्या अवयवांना औषधांची गरज नाही त्या अवयवांनाही औषधी आपोआप पोहोचत असल्यामुळे दुसर्याच आजाराची शक्यता (साईड इफेक्टस) असते. याचाच विचार करू न ह्यमाफसूह्णच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या शास्त्रज्ञांनी (नॅनो टेक्नालॉजी डेव्हलप फार्म्युलेशन ) संशोधन केले आहे. या संशोधनामुळे नेमक्या आजारावर औषधाची मात्रा लागू होते. यासाठीचे प्रात्यक्षिक या शास्त्रज्ञांनी घेतले आहे. माफसूचे मुंबई व्हेटरनरी कॉलेज आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीसोबत संयुक्तरीत्या हे संशोधन करण्यात आले. या तंत्रज्ञानाचे चांगले परिणाम बघता, या शास्त्रज्ञांनी आता नवे संशोधन हाती घेतले आहे. ज्यामध्ये प्राण्यांमधील क्षयरोग व थायलेरियासारख्या आजारावर उपचारासाठी संशोधन केले जात आहे. या आजारामुळे प्राण्यांमधील रक्तपेशी (रक्ताशय) खराब होतात. शरीरातील रक्त कमी होते. यामुळे प्राणी दगावण्याची शक्यता असते. या आजारावर उपचार करणारे संशोधन प्रयोगशाळेत व प्राण्यांवरही तपासण्यात आले आहे. या सर्व संशोधनामुळे नेमक्या दुखण्यावर यथोचित उपचार होत असल्यामुळे शरीरातील इतर अवयवांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. तसेच उपचार योग्य होते आणि औषधाची मात्रा कमी लागते. यामुळे प्राण्यांवरील उपचार पद्धती सोपी झाली आहे. माफसूमध्ये प्राणी संशोधनावर भर दिला जात असून, वेगवेगळ्या उपचार पद्धतीवर नवे संशोधन करण्यात आले आहे. नॅनो टेक्नॉलॉजी डेव्हलप ड्रग्स फार्म्युलेशन हे त्यातीलच एक संशोधन आहे. यामुळे नेमक्या आजारावर उपचार करणे सोपे झाले असल्याचे मत कुलगुरू डॉ. आदित्यकु मार मिश्र यांनी नोंदविले
नेमक्या दुखण्यावरच काम करेल औषधी!
By admin | Published: June 06, 2014 12:52 AM