शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पिंपरीच्या आरटीओ कार्यालयातील 'मी टू'चे प्रकरण चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 10:10 PM

पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने सहकारी महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देविविध कार्यालयांमध्ये विशाखा समिती कुचकामी हे स्पष्ट देशभर चर्चेत असलेले 'मी टू'चे वादळ आता पिंपरी चिंचवडला पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने सहकारी महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देशभर चर्चेत असलेले 'मी टू'चे वादळ आता पिंपरी चिंचवडला धडकले आहे. सुबोध मेडशिकर असे 'मी टू' प्रकरणात अडकलेल्या आरटीओ अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी  दिलेल्या महितीनुसार,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर काम करत असलेल्या मेडशीकर याने कार्यालयात काम करीत असलेल्या महिलेचा विनयभंग केला. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. काम करीत असताना, तिच्या अवती भोवती थांबणे, जेवणासाठी बरोबर येण्याचा आग्रह करणे, अशा प्रकारे तो पाठलाग करीत होता. वॉशरूमला जात असताना तिला, ''तुझे करिअर संपून टाकेन असे धमकावले.  मे २०१७ ते ७जून २०१८ पर्यंत हा प्रकार सुरू होता. या त्रासाला वैतागून अखेर महिलेने कार्यालयातील विशाखा समितीकडे तक्रार नोंदवली. दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने दिलेला अहवाल फिर्यादी महिलेला मिळाला नाही. आरोपीवर काहीच कारवाई होत नसल्याने या अहवालात आरोपीला क्लीन चिट दिल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे पीडित महिला थेट पोलीस ठाण्यात गेली. पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल झाली, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अद्याप अटक झालेली नाही. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. .........................विशाखा समिती कुचकामीशासनाच्या आदेशानुसार विविध कार्यालयांमध्ये 'विशाखा' समिती स्थापन झाल्या. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी स्थापन झालेल्या समित्या महिलांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळMolestationविनयभंग