उल्हासनगर : साई पक्ष फोडण्यासाठी शिवसेनेने जंग जंग पछाडूनही तो पक्ष आपल्यासोबत राखण्यात भाजपाला यश आल्याने उल्हासनगर पालिकेवर बुधवारी अखेर भाजपाचाच झेंडा फडकला. भाजपाच्या मीना आयलानी महापौरपदी निवडून आल्या, तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या साई पक्षाचे प्रमुख जीवन ईदनानी उपमहापौर झाले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही निवडणूक लढविण्यापासून सत्ता स्थापन होईपर्यंत संपूर्ण परिस्थिती आपल्या हाती ठेवल्याचा भाजपाला फायदा झाला. शिवसेनेच्या गोटातील एक नगरसेवक आयत्यावेळी फोडण्यातही भाजपाला यश आले.साई पक्षाने घटना सादर न केल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेने त्या पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी प्रयत्न चालवले होते. मात्र कोकण विभागीय आयुक्तांनी मंगळवारी रात्री त्या पक्षाच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक सुरू होताच शिवसेनेसह मित्रपक्षांनी साई पक्षाच्या गट मान्यतेवरून महासभेत ठिय्या दिला. तसेच निवडणूक अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना जाब विचारत सभात्याग केला. (प्रतिनिधी)
मीना आयलानी उल्हासनगरच्या महापौर
By admin | Published: April 06, 2017 5:22 AM