ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 2 - ठाणे महानगरपालिका महापौर आणि उप महापौर पदासाठी शिवसेनेकडून निष्ठावंतांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेनं महापौर पदासाठी मीनाक्षी शिंदे तर उपमहापौर पदासाठी रमाकांत मढवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी, मीनाक्षी शिंदे यांनी आरोग्य समितीचे सभापतीपदही भूषवले आहे.
तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी अशरिन राऊत व उपमहापौर पदासाठी शारदा गायकवाड यांना रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, 131 जागांच्या ठाणे महापालिकेत 67 जागांसह शिवसेनेकडे पूर्ण बहुमत आहे.
दुसरीकडे, शिवसेनेचे नगरसेवक सध्या अलिबागला पिकनिक करत असल्याची माहितीही समोर आली आहे.
मीनाक्षी शिंदे
रमाकांत मढवी