शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

मुरलीमनोहर जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट

By admin | Published: April 22, 2017 10:28 PM

भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली.

ऑनलाइन लोकमत 
नागपूर, दि. 22 -  भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. बाबरी मशीद प्रकरणात लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह भाजप व संघ परिवाराशी संबंधित एकूण १३ नेत्यांविरुद्ध कट कारस्थान रचल्याचा आरोप ठेवून खटला चालविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला होता. या पार्श्वभुमीवर जोशी यांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानण्यात येत आहे. 
 
मुरली मनोहर जोशी यांची ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सायंकाळी ५ च्या सुमारास जोशी संघ मुख्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. यावेळी इतरही कुणी पदाधिकारी होते का हे कळू शकले नाही. सुमारे दीड तास जोशी मुख्यालयात होते व साडेसहाच्या सुमारास ते शहरातील एका तारांकित हॉटेलकडे रवाना झाले. 
 
अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी जमीनदोस्त केली. त्या वेळी मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे अध्यक्ष होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वयाच्या अडवाणी व जोशी यांना ८९ व ८४ व्या वर्षी खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जोशी यांनी सरसंघचालकांशी घेतलेल्या भेटीला महत्त्व आले आहे. यासंदर्भात भाष्य करण्यास संघाच्या पदाधिकाºयांनी नकार दिला.