शिवाजी सुरवसे/ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 11- इंद्रायणी आणि भीमा नदीतीच्या प्रदूषणाबाबत नमामी गंगेच्या धर्तीवर शासनाने नमामी चंद्रभागा अभियान सुरू केले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नदीकाठच्या विविध गावच्या मलनित्सारण योजना आणि पाणीपुरवठा योजनेचा आराखडा केला असून ३५२ कोटींच्या या आराखड्यात विविध कामांचा समावेश आहे़ पाणीपुरवठा, स्वच्छता व पर्यावरण मंत्री बबनराव लोणीकर यांनी या अभियानाबाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिकाऱ्यांची १३ जूलै रोजी दुपारी १२ वाजता पुण्यात बैठक आयोजित केली आहे़ जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार तसेच पुणे आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरीचिंचवड, सोलापूर महापालिकेचे आयुक्त, पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसीचे पुणे आणि सोलापूरचे अधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीस बोलाविले आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हा संभाव्य आराखडा तयार केला आहे़ नदीच्या तिरावर असलेली गावे त्यांची आत्ताची लोकसंख्या, २०१७ ची लोकसंख्या आणि २०३२ ची लोकसंख्या याचा विचार करुन भीमा नदीत घाण पाणी मिसळू नये यासाठी नियोजन केले जात आहे़ वास्तविक पाहता पुण्यातील नद्यातूनच दूषित झालेले पाणी उजनी धरणात मिसळते त्यामुळे तेथील प्रदूषण रोखणे हे खूप मोठे काम आहे़ सोलापूर जिल्ह्यातील प्रदूषणापेक्षा भीमा नदी पुणे जिल्ह्यातच जास्त प्रदूषित होते़ नदीकाठचे उद्योग, कारखाने यांचे देखील दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर नदीत मिसळते त्यामुळे या प्रदूषणावर आळा बसविणे खूप मोठे काम आहे़ नमाची चंद्रभागा अभियानासाठी २० कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे़ दशक्रिया विधीपासून ते उद्योगाचा प्रदूषण रोखण्यापर्यंत आणि पुण्यातून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रदूषण रोखणे महत्त्वाचे आहे़ सध्या गटारगंगेप्रमाणे अत्यंत घाण पाणी पुण्यातून भीमानदीत मिसळते ही वस्तुस्थिती सर्वांना माहित आहे़................................या प्रमुख कामांचा समावेश-उजनी धरणापासून भीमा नदीच्या दोन्ही तिरावरील ११३ गावासाठी नांदेड पॅटर्नप्रमाणे सांडपाणी व्यवस्थापन योजना करणे-१२४ कोटी रुपये-गोपाळपूर, वाखरी, लक्ष्मी टाकळी, भटूंबरे, शेगाव दुमाला व आढीव गावांसाठी पाणीपुरवठा व मलनि:सारण योजना करणे-८६ कोटी-पंढरपूर शहरात २४ तास आणि ७ दिवस पाणीपुरवठा करण्यासाठी विविध कामे करणे-६३ कोटी-पंढरपूर शहरात भुयारी गटारी योजना टप्पा क्रमांक ३ करणे -६५ कोटी -चंद्रभागा नदीच्या पश्मिच तिरावर दशक्रिया विधी घाट बांधणे- १५ कोटी रुपये