शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शरद पवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांच्यात बैठक होणार; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 3:11 PM

येत्या ८-१० दिवसांत ही बैठक होईल अशी माहिती अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांनी दिली आहे

पुणे - महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतील २ गटातील वाद वाढतच चालला आहे. त्यामुळे आता हा वाद मिटवण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहे. याबाबत पवार येत्या ८-१० दिवसांत खासदार बृजभूषण सिंह यांची भेट घेणार असल्याची माहिती काका पवार यांनी दिली आहे. कुस्तीगीर परिषदेतील २ गटांमुळे कुस्तीपटूमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे हा वाद मिटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतील वाद न्यायालयात पोहचला आहे. या दोन्ही गटाकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन आम्हीच करणार असं जाहीर करण्यात आले आहे. बाळासाहेब लांडगे यांच्या गटाकडून डिसेंबर महिन्यात अहमदनगरमध्ये या स्पर्धा भरवू असं सांगण्यात आले आहे. तर दुसऱ्या गटाकडून ११ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवू असं जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कुस्तीपटूमध्ये मोठा संभ्रम आहे. या वादामुळे कुस्तीपटूचे नुकसान होऊ नये यासाठी पवार-बृजभूषण सिंह यांनी बैठक घेण्याचं ठरवलं आहे. 

येत्या ८-१० दिवसांत ही बैठक होईल अशी माहिती अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांनी दिली आहे. शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. बृजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेतील हा वाद मिटणार का? यासाठी पवार-बृजभूषण सिंह यांच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

काय आहे वाद?महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावरुनच आता राजकीय कुस्ती होत असल्याचं दिसून येत आहे. कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार बाळासाहेब लांडगे यांना नाही. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. मामासाहेब मोहोळ यांचे नातेवाईक मुरलीधर यांना यंदाच्या अधिवेशनाचा मान देण्यात आला आहे. परंतु लांडगे यांना मोहोळही चालत नाही आणि आम्हीही असं मत खासदार रामदास तडस यांनी परखडपणे व्यक्त केले होते. 

तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचा अधिकार आपल्यालाच असल्याचा दावा कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरुन वाद रंगला आहे. जुलै महिन्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारणसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा