शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

पालिकेत ९ मार्च रोजी रंगणार निरोपाची सभा

By admin | Published: March 04, 2017 12:43 AM

महापालिकेच्या मावळत्या सभागृहातील सभासदांची शेवटची निरोपाची मुख्य सभा ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

पुणे : महापालिकेच्या मावळत्या सभागृहातील सभासदांची शेवटची निरोपाची मुख्य सभा ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. गेल्या ५ वर्षांत सभासदांनी पार पाडलेली विकासकामे, सभागृहाचे कामकाज यांना उजाळा देत निवडून न आलेल्या सदस्यांना निरोप दिला जाणार आहे. महापालिकेच्या १५२ सदस्यांच्या सभागृहात ६७ नगरसेवक पुन्हा निवडून येण्यात यशस्वी ठरले; मात्र उर्वरित ८५ नगरसेवक नवीन सभागृहामध्ये नसतील. त्यांपैकी काहींनी निवडणूक लढवलेली नाही, तर काहींना पराभव स्वीकारावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर निरोपाची सभा ९ मार्च राजी रंगणार आहे. सध्याच्या महापालिका सभागृहाची मुदत ही १५ मार्चपर्यंत आहे. त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या सभासदांची मुख्य सभा अस्तित्वात येईल. महापौर निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया पार पडेल. महापालिकेमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविलेले असल्याने आता केवळ भाजपाकडून महापौरपदाच्या उमेदवारीसाठी कोणाची निवड केली जाते, याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपाकडून महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आदी पदांवरील उमेदवारांच्या निवडीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडल्यानंतर देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपाकडून उमेदवारांच्या निवड केली जाण्याची शक्यता आहे.>महापौरपदासाठी ८ मार्च रोजी अर्ज भरले जाणारनवीन महापौरांची निवड १५ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता केली जाईल. त्यानुसार महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ८ मार्च रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत नगरसचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल करावे लागतील. १५ मार्च रोजी सकाळी ११ ते ११.३० या वेळेत अर्ज माघारी घेता येतील. त्यानंतर ११.३० वाजता निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होऊन नवीन महापौरांची निवड होईल.>गोंधळाला आळा घालण्यासाठी नवी नियमावलीमहापालिका सभागृहात होणाऱ्या गोंधळाला आळा बसावा म्हणून सभागृह कामकाजाची नवी नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. नव्या सभागृहातील महापौर व सभागृह नेत्यांच्या संमतीने हा प्रस्ताव मंजूर करून नंतर अमलात आणला जाईल. तसेच, सर्व नगरसेवकांची सभागृहातील उपस्थिती यापुढे बायमेट्रिक पद्धतीनेच नोंदवली जाणार आहे.सभागृहात काही सदस्यांकडून एखाद्या विषयासंदर्भात गोंधळ घातला जातो. अलीकडे असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. महापौरांना काम करू देणे अशक्य केले जाते. त्यामुळे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी तर विधानसभेप्रमाणे महापालिका सभागृहातही मार्शल ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी लेखी मागणी थेट राज्य सरकारकडेच केली होती. त्याचबरोबर प्रश्नोत्तरांमध्ये वेळ घालवणे, चर्चा लांबवणे असेही प्रकार घडतात. त्यामुळेच सभेच्या कामकाजाला शिस्त लागावी, यासाठी प्रशासनाने नव्याने सभागृह कामकाज नियमावली तयार केली आहे. महापौर व सभागृह नेत्यांना दाखवून सभागृहाच्या संमतीने ही नियमावली अमलात आणली जाईल, अशी माहिती नगरसचिव सुनील पारखी यांनी दिली.पालिकेच्या मावळत्या सभागृहातील नगरसेवकांच्या सभेतील उपस्थितीसाठी बायोमेट्रिक पद्धतीची व्यवस्था केली होती; मात्र फारच थोड्या नगरसेवकांनी त्याला प्रतिसाद दिला. या वेळी मात्र सर्व नगरसेवकांची उपस्थितीची हीच पद्धत केली जाणार असल्याचेही पारखी यांनी स्पष्ट केले. सभागृहाच्या नूतनीकरणाच्या वेळेसच ही व्यवस्था करण्यात आली होती. आता सुरुवातीपासूनच यासाठी प्रयत्न केले जातील, असे पारखी म्हणाले.