कोल्हापूर : केंद्र सरकारने ठरवून दिलेला साखर निर्यातीचा कोटा किती कारखान्यांनी पूर्ण केला आहे, याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी १ वाजता पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. १२ टक्क्यांप्रमाणे साखर निर्यात न करणाऱ्यांच्या सवलती रोखण्याचा गांभीर्याने विचार केला जात आहे. दरातील घसरण थांबावी व साखर गळीत हंगाम सुरळीत व्हावा, यासाठी केंद्राने प्रत्येक कारखान्याला १२ टक्के निर्यातीचा कोटा दिला होता.
साखर कारखानदारांची आज पुण्यात बैठक
By admin | Published: February 22, 2016 2:11 AM