शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

आज मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 1:04 AM

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर, हार्बर मार्गाच्या

 लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर, हार्बर मार्गाच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप-डाउन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक असणार आहे.मध्य मार्गावर कल्याण-ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. या काळात डाउन जलद मार्गावरील लोकलला सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबा देण्यात येईल, तर अप मार्गावरील ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार असून, तेथूनच डाउन दिशेला ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन रवाना करण्यात येईल.हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहील. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष ट्रेन चालविण्यात येतील. मेगाब्लॉक कालावधीत सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मध्य मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.पश्चिम मार्गावर जम्बो ब्लॉकपश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाउन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, विरार-वसई रोड ते बोरीवली-गोरेगाव दरम्यानची अप आणि डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाउन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे, तसेच ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.