- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण, हार्बरवर कुर्ला-वाशी मार्गावर विशेष ब्लॉक तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली-नायगाव स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.ठाणे-कल्याण डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ब्लाकॅ घेण्यात येईल. या कामांमुळे ठाणे-कल्याण मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉकमुळे लोकल सुमारे १५-२० मिनिटे उशिराने धावणार आहेत. हार्बरवर कुर्ला ते वाशी या अप आणि डाउन मार्गावर सकाळी. ११.२० ते दु. ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसटी ते पनवेल, बेलापूर, वाशी मार्गावर स. १०.२० ते दु. ३.४८ पर्यंत आणि पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसटी मार्गावरील सेवा बंद राहील. ब्लॉक दरम्यान सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल या मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतील.पश्चिम मार्गावरील बोरिवली ते नायगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर स. ११ ते दु. ३ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान अप मार्गावरील सर्व गाड्या विरार, वसई रोड ते बोरीवलीपर्यंत अप जलद मार्गावर तर डाऊन दिशा मार्गावरील गोरेगाव ते वसई रोड, विरार स्थानकादरम्यान डाऊन जदल मार्गावर चालविण्यात येतील. ब्लॉक दरम्यान भार्इंदरसाठी कोणतीही सेवा चालविण्यात येणार नाही.