Maharashtra Budget 2022: सव्वाचार लाख व्यावसायिकांना ‘व्हॅट’ माफीचे मेगा पॅकेज; १० हजारांपर्यंतची थकबाकी पूर्णपणे माफ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 06:56 AM2022-03-12T06:56:33+5:302022-03-12T06:57:08+5:30

Maharashtra Budget 2022: कोरोनामुळे उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम झालेला असताना या क्षेत्राला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या दोन अभय योजनांपेक्षा या योजनेत अधिक सवलती देण्यात आल्या आहेत. 

Mega package of ‘VAT’ waiver for 4.25 lakh traders; Arrears of up to Rs 10,000 are completely forgiven in Maharashtra Budget 2022 | Maharashtra Budget 2022: सव्वाचार लाख व्यावसायिकांना ‘व्हॅट’ माफीचे मेगा पॅकेज; १० हजारांपर्यंतची थकबाकी पूर्णपणे माफ 

Maharashtra Budget 2022: सव्वाचार लाख व्यावसायिकांना ‘व्हॅट’ माफीचे मेगा पॅकेज; १० हजारांपर्यंतची थकबाकी पूर्णपणे माफ 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील तब्बल सव्वाचार लाख व्यावसायिक/उद्योजकांना पूर्वीच्या मूल्यवर्धित कर (व्हॅट) थकबाकीत तब्बल १ लाख ५० हजार कोटी रुपयांची माफी देण्याची तरतूद असलेली अभय योजना उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केली. 

कोरोनामुळे उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम झालेला असताना या क्षेत्राला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या दोन अभय योजनांपेक्षा या योजनेत अधिक सवलती देण्यात आल्या आहेत. 

१० हजार रुपयांपर्यंतची व्हॅटची थकबाकी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. त्याचा फायदा थकबाकीच्या एक लाख प्रकरणांना होईल. १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असेल तर २० टक्के रक्कम भरल्यानंतर ८० टक्के थकबाकी माफ केली जाईल. १० लाखांपेक्षा अधिकची थकबाकी असेल तर २००५ पूर्वीची थकबाकी आणि २००५ ते २०१७ पर्यंतची थकबाकी असे दोन भाग करण्यात आले आहेत. थकबाकी २००५ पूर्वीची असेल तर अविवादित कर १०० टक्के भरावा लागेल.  विवादित कराची ३० टक्के रक्कम भरावी लागेल. तर व्याजाची १० टक्के व दंडाची पाच टक्केच रक्कम भरावी लागेल. अन्य थकबाकी माफ होईल. 
२००५ ते २०१७ दरम्यानची व्हॅटची थकबाकी असेल तर अविवादित कराची १०० टक्के रक्कम भरावी लागेल. विवादित कराची ५० टक्के, व्याजाची १५ टक्के तर दंडाची पाच टक्के रक्कम भरावी लागेल. अन्य थकबाकी माफ होईल. 

व्हॅट थकबाकीच्या १ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी १ लाख ४५ हजार कोटी रुपयांची थकबाकी ही १० लाख रुपयांहून अधिकच्या थकबाकीदारांकडे प्रलंबित आहे. 

सोने, चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ
सोने, चांदीच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या दस्तांवर मुद्रांक अधिनियमानुसार सध्या आकारण्यात येणारा ०.१ टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे राज्यास १०० कोटींच्या महसुली तुटीची शक्यता आहे.

किती जणांना लाभ मिळणार
१लाख - १० हजार रु.पर्यंतचे 
२.५०लाख - १० हजार रु.पर्यंतचे 
७५हजार- १० लाख रु.वरील

Web Title: Mega package of ‘VAT’ waiver for 4.25 lakh traders; Arrears of up to Rs 10,000 are completely forgiven in Maharashtra Budget 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.