शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

Maharashtra Budget 2022: सव्वाचार लाख व्यावसायिकांना ‘व्हॅट’ माफीचे मेगा पॅकेज; १० हजारांपर्यंतची थकबाकी पूर्णपणे माफ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 6:56 AM

Maharashtra Budget 2022: कोरोनामुळे उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम झालेला असताना या क्षेत्राला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या दोन अभय योजनांपेक्षा या योजनेत अधिक सवलती देण्यात आल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील तब्बल सव्वाचार लाख व्यावसायिक/उद्योजकांना पूर्वीच्या मूल्यवर्धित कर (व्हॅट) थकबाकीत तब्बल १ लाख ५० हजार कोटी रुपयांची माफी देण्याची तरतूद असलेली अभय योजना उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केली. 

कोरोनामुळे उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम झालेला असताना या क्षेत्राला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या दोन अभय योजनांपेक्षा या योजनेत अधिक सवलती देण्यात आल्या आहेत. 

१० हजार रुपयांपर्यंतची व्हॅटची थकबाकी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. त्याचा फायदा थकबाकीच्या एक लाख प्रकरणांना होईल. १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असेल तर २० टक्के रक्कम भरल्यानंतर ८० टक्के थकबाकी माफ केली जाईल. १० लाखांपेक्षा अधिकची थकबाकी असेल तर २००५ पूर्वीची थकबाकी आणि २००५ ते २०१७ पर्यंतची थकबाकी असे दोन भाग करण्यात आले आहेत. थकबाकी २००५ पूर्वीची असेल तर अविवादित कर १०० टक्के भरावा लागेल.  विवादित कराची ३० टक्के रक्कम भरावी लागेल. तर व्याजाची १० टक्के व दंडाची पाच टक्केच रक्कम भरावी लागेल. अन्य थकबाकी माफ होईल. २००५ ते २०१७ दरम्यानची व्हॅटची थकबाकी असेल तर अविवादित कराची १०० टक्के रक्कम भरावी लागेल. विवादित कराची ५० टक्के, व्याजाची १५ टक्के तर दंडाची पाच टक्के रक्कम भरावी लागेल. अन्य थकबाकी माफ होईल. 

व्हॅट थकबाकीच्या १ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी १ लाख ४५ हजार कोटी रुपयांची थकबाकी ही १० लाख रुपयांहून अधिकच्या थकबाकीदारांकडे प्रलंबित आहे. 

सोने, चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफसोने, चांदीच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या दस्तांवर मुद्रांक अधिनियमानुसार सध्या आकारण्यात येणारा ०.१ टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे राज्यास १०० कोटींच्या महसुली तुटीची शक्यता आहे.

किती जणांना लाभ मिळणार१लाख - १० हजार रु.पर्यंतचे २.५०लाख - १० हजार रु.पर्यंतचे ७५हजार- १० लाख रु.वरील

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट २०२२Ajit Pawarअजित पवार