शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

मेगाब्लॉकमुळे झाले मेगाहाल

By admin | Published: June 26, 2017 2:49 AM

ठाकुर्ली स्थानकाजवळ होणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या सहा तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ठाकुर्ली स्थानकाजवळ होणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या सहा तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे आधीच रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यात कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान वाहतुकीसाठी केलेली पर्यायी व्यवस्था कोलमडल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली. जवळपास दोन तास प्रवासी कल्याण स्थानकात अडकून पडले. त्यातील काहींनी रिक्षाने डोंबिवलीला येऊन प्रवास केला, तर काहींनी माघारी जाण्याचा पर्याय स्वीकारला.रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने येणारी वाहतूक कल्याणहून वळविण्यात आली, तर मुंबईहून येणारी लोकल वाहतूक डोंबिवलीपर्यंतच नेण्यात येत होती. त्यामुळे या दोन्ही स्थानकांदरम्यान कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस तैनात करण्यात आल्या होत्या, परंतु त्याही अपुऱ्या ठरल्या. त्यामुळे रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणे लूट केली. नेहमी प्रति प्रवासी आकारल्या जाणाऱ्या २४ रुपयांऐवजी ५० रुपये आणि त्यापेक्षा अधिक रक्कम घेतली जात होती. या मेगाब्लॉकमुळे सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत जलद वाहतूक बंद राहाणार होती, पण गर्डरच्या कामासाठी मागविलेली हायड्रोलिक क्रेन वारंवार बिघडत असल्याने, जलद मार्ग एक तास उशिरा वाहतुकीसाठी खुला झाला, तर धिम्या मार्गावरील वाहतूक सकाळी ९ ते दुपारी ४ अशी सहा तास बंद राहाणार होती. मात्र, गर्डरच्या कामाला विलंब लागत असल्याने, त्याच्या कामाचा अंदाज घेऊन ती वाहतूक तासभर लवकर सुरू करण्यात आली. मात्र, कल्याण ते डोंबिवलीदरम्यान समांतर रस्ता व्यवस्थित सुरू नसल्याने, दोन्ही रेल्वे स्थानकांपासून सुटलेल्या बसेस डोंबिवली शहरातून नेण्यात आल्या. परिणामी, या प्रवासास पाऊण तास लागत होता. त्याचाही फटका प्रवाशांना बसला.पुढच्या महिन्यात पुन्हा ब्लॉक-एकच गर्डर टाकण्याचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्याने, दुसऱ्या गर्डरसाठी ९ जुलैला पुन्हा मेगाब्लॉक घेतला जाण्याची शक्यता आहे. तो किती काळाचा असेल, ते रेल्वेने अद्याप जाहीर केलेले नाही. दरम्यान, अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान नाल्याच्या कामासाठी चार तास होणारा ट्रॅफिक ब्लॉक पावसामुळे रेल्वेने रद्द केला.तलाव क्षेत्रातही पावसाची दमदार हजेरीमुंबई शहर आणि उपनगरात पावसाने कहर केला असतानाच, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर, तानसा, विहार, तुलसी, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा या सातही तलाव क्षेत्रांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात तलाव क्षेत्रात समाधानकारक पातळी नोंदविण्यात येत असल्याने, महापालिकेलाही दिलासा मिळाला असून, पुढील तीन महिने पावसाचा वेग असाच कायम राहिला, तर मुंबईकराचे पाण्याचे टेन्शन मिटणार आहे.तलावपातळी (मीटर्स)पाऊस (मिमी)-मोडक सागर१५१.९४२८१तानसा१२२.९३३४०.४०विहार७५.५२८८तुलसी१३४.०१७५अप्पर वैतरणा५९३.५७१६०भातसा११३.२३१८४मध्य वैतरणा२६९.७४२१८.३०