शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रेल्वेचा मेगाब्लॉक; २० ऑक्टोंबरपर्यंत शनिवारी, रविवारी इंटरसिटी एक्सप्रेस बंद

By appasaheb.patil | Published: September 06, 2019 1:08 PM

दौंड ते सोलापूर दरम्यान हाती घेतले ट्रकचे काम; इतर गाड्यांच्या मार्गात केला बदल

ठळक मुद्देसुरक्षिततेशी संबंधित देखरेख करण्यासाठी रेल्वेने ब्लॉक घेतला दुहेरीकरणाच्या कामानंतर आता इंजिनिअरिंग विभागाकडून ट्रॅकचे काम हातीकाही गाड्या आठवड्यातून दोन दिवस तर काही गाड्यांच्या मार्गात बदल केला

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात दौंड ते सोलापूरदरम्यान ट्रॅकच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे़ दरम्यान, ७ सप्टेंबर ते २० ऑक्टोंबरपर्यंत प्रत्येक शनिवार आणि रविवारी गाडी क्रमांक १२१६९/१२१७० पुणे-सोलापूर - पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

सोलापूर विभागातील दौंड ते सोलापूरदरम्यान झालेल्या दुहेरीकरणाच्या कामानंतर आता इंजिनिअरिंग विभागाकडून ट्रॅकचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करीत असताना सुरक्षिततेशी संबंधित देखरेख करण्यासाठी रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकच्या कामासाठी गाडी क्रमांक १२१६९/१२१७० पुणे-सोलापूर-पुणे ही गाडी प्रत्येक शनिवार व रविवारी तर गाडी क्रमांक ११००१/०२ साईनगर-पंढरपूर-साईनगर एक्सप्रेस ही गाडी मंगळवार, गुरूवार व रविवारी रद्द करण्यात आली आहे.

याशिवाय गाडी क्रमांक १७०१३ पुणे-हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी ७, १४, २१, २८ सप्टेंबर व ५, १२, १९ आॅक्टोबर या कालावधीत कुर्डूवाडी-पुणे स्थानकादरम्यान धावणार नाही़ मात्र कुर्डूवाडी स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे.

मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या...- प्रत्येक शनिवार व रविवारी गाडी क्रमांक ७१४१४ डेमू सोलापूर ते कुर्डूवाडी स्थानकापर्यंत धावणार आहे़ गाडी क्रमांक ७१४१५ कुर्डूवाडी ते सोलापूर ही गाडी आपल्या निर्धारित वेळेवर कुर्डूवाडी स्थानकावरून सुटणार आहे़ दरम्यान, गाडी क्रमांक ७१४१४ कुर्डूवाडी ते भिगवण स्थानकादरम्यान प्रत्येक शनिवार व रविवारी धावणार नाही़ 

- गाडी क्रमांक ७१४१५ डेमू पुणे ते भिगवण स्थानकापर्यंत धावणार आहे़. गाडी क्रमांक ७१४१४ भिगवण ते पुणे आपल्या निर्धारित वेळेवर भिगवण स्थानकावरून सुटणार आहे़ गाडी क्रमांक ७१४१५ भिगवण ते कुर्डूवाडी स्थानकावरून धावणार नाही़ 

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात मागील काही दिवसांपूर्वी दुहेरीकरणाचे काम झाले आहे़ या कामानंतर आता ट्रॅकच्या कामासाठी रेल्वेने दौंड ते सोलापूर विभागात ब्लॉक घेतला आहे़ काही गाड्या आठवड्यातून दोन दिवस तर काही गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे़ या बदलाची माहिती घेऊनच प्रवाशांनी प्रवास करून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे़- प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर विभाग

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेSolapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे