नवी मुंबई : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे अत्याधुनिक स्मृतीभवन उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सानपाडा येथे 22485 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर सदर वास्तू उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री गणोश नाईक यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सानपाडा सेक्टर-1क्, येथील भूखंड क्रमांक 187 वर हे अत्याधुनिक स्मृतीभवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार संदीप नाईक यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार सदर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कामाचे पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांचे भवन हे त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारे ठरणार आहे. त्यादृष्टीने त्यांच्या साहित्यसंपदेने परिपूर्ण ग्रंथालय या ठिकाणी असावे. त्यांच्या साहित्यकृतीवरील नाटके, चित्रपटांच्या ध्वनी-चित्रफिती याठिकाणी जतन केल्या जाव्यात. अण्णाभाऊंच्या प्रेरक वाक्यांचे फलक याठिकाणी प्रदर्शित केले जावेत जेणोकरुन या ठिकाणी भेट देणारे विचारांनी समृद्ध होतील, अशा सूचना पालकमंत्री नाईक यांनी यावेळी केल्या.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजीव गणोश नाईक, ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, शिक्षण मंडळाचे सभापती सुधाकर सोनवणो, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब गोपले, स्थानिक नगरसेवक काशिनाथ पाटील, नगरसेवक केशव म्हात्रे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)