शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

‘आधुनिक वाल्मीकीं’च्या आठवणींना उजाळा...

By admin | Published: October 08, 2015 1:40 AM

मराठी मनाच्या अंतरंगात रुंजी घालणाऱ्या कविता, गीते सादर करून, कवी, साहित्य प्रतिभेचे श्रेष्ठत्व आणि कलासंस्कृती समृद्ध

पिंपरी : मराठी मनाच्या अंतरंगात रुंजी घालणाऱ्या कविता, गीते सादर करून, कवी, साहित्य प्रतिभेचे श्रेष्ठत्व आणि कलासंस्कृती समृद्ध करणाऱ्या आठवणी सांगत महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी अर्थात गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांना शब्दसुमनांजली अर्पण केली. गदिमा कविता महोत्सवातून शब्दप्रभूंच्या आठवणींना बुधवारी उजाळा देण्यात आला.महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी वतीने आयोजित केलेल्या २०व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य होत्या. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, गदिमा प्रतिष्ठानाचे मुख्य विश्वस्त श्रीधर माडगूळकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.गदिमा काव्य महोत्सवात राज्यभरातील प्रतिभावान कविता, विविध विषयांवरील कविता सादर करून सामाजिक भान दिले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महाकवीचे श्रेष्ठत्व रसिकांना सांगितले. अध्यक्षीय भाषणात वैद्य यांनी गदिमांना शब्दसुमनांजली अर्पण केली. कुसुमाग्रजांची ‘ओळखलंत का सर मला...’ ही कविता सादर केली.पुरस्कारार्थींची नावे : गदिमा काव्यगौरव पुरस्कार अभिनेते मकरंद अनासपुरे, जीवनगौरव पुरस्कार मधुकर भावे, काव्यप्रतिभा पुरस्कार अनिल कांबळे, अरुण शेवते, गदिमा साहित्य पुरस्कार जळगावच्या डॉ. अस्मिता गुरव, गणेश मरकड (अहमदनगर), प्रा. रेखा कोरे (रायगड), विष्णू थोरे (नाशिक), आबासाहेब पाटील (बेळगाव), स्नेहबंध पुरस्कार डॉ. विलास साबळे, उद्योजक विकास पुरस्कार परशुराम बोऱ्हाडे, संस्कारक्षम शाळा पुरस्कार श्रीराम विद्या मंदिर भोसरी, श्रमजीवी विद्यालय भोसरी, मृत्युंजय साहित्य पुरस्कार डॉ. श्रीकांत येळेगावकर, आनंद पिंपळकर यांना प्रदान करण्यात आला. तर गदिमांचे वारसदार म्हणून रेणू पाचपोर (परभणी), माधव पवार (सोलापूर), लता कदम (सांगली), चंद्रकांत वानखेडे (सिंहगड), अनुजा कल्याणकर (पुणे), अस्मिता चांदणे (भोसरी), दीपेश सुराणा (पिंपरी), डॉ. भीम गायकवाड (पुणे)