शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सेनेच्या ‘डिड यू नो’ला मनसेचे ‘येस वुई नो’चे प्रत्युत्तर

By admin | Published: January 18, 2017 2:37 AM

शिवसेनेने ‘डीड यू नो’ आशयाखाली सर्वत्र पोस्टर प्रदर्शित करत, तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

चेतन ननावरे,

मुंबई- शिवसेनेने ‘डीड यू नो’ आशयाखाली सर्वत्र पोस्टर प्रदर्शित करत, तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पोस्टरविरोधात मनसेने ‘येस वुुई नो’ आशयाची पोस्टर सीरिज सोशल मीडियावर वायरल केली आहे. या पोस्टरमधून मनसेने सेनेच्या विकासकामांची खिल्ली उडवली आहे.या पोस्टरबाबत सांगताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, गेल्या ५ वर्षांत महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला मुंबईकरांना पायाभूत सुविधाही पुरवता आल्या नाहीत. तरीही ‘करून दाखवले’ आणि ‘डीड यू नो’ अशा पोस्टरमधून विकासकामांच्या बाता मारल्या जात आहेत. सेनेचा हा भंपकपणा उघड करण्याचे काम मनसेने केले आहे. यापुढेही महापालिका प्रशासनाच्या खोट्या दावांची पोलखोल मनसे करत राहील, असेही त्यांनी सांगितले. मनसेने वायरल केलेल्या पोस्टरमध्ये मुंबईतील खड्डे, महापालिका शाळा, बेस्ट दरवाढ, कचरा घोटाळा या विविध मुद्द्यांवरून सेनेचा समाचार घेतला आहे. त्यात मुंबईकरांचे १८२ कोटी रुपये खड्ड्यांत घालून, मुंबईकरांच्या नशिबी खड्डेच आल्याचे सांगण्यात आले आहे. खड्ड्यांसोबतच बेस्टच्या किमान भाड्यात केलेल्या वाढीवर मनसेने टीका केली आहे. २०१२ साली बेस्टचे किमान भाडे फक्त ३ रुपये होते. याउलट २०१७ मध्ये बेस्टचे किमान थेट ८ रुपयांवर पोहोचले आहे, याशिवाय बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन महापालिकेला जमले नसल्याचा आरोप मनसेने पोस्टरमधून केला आहे.>‘शिवसेनेला सोशल मीडियातून उत्तर देणार’शिवसेना, भाजपाची गेली २२ वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्ता असूनही मुंबईकरांना मूलभूत सुविधा देण्यात ते अपयशी ठरले आहेत. पालिकेत अनेक भ्रष्टाचार व घोटाळे झाले. तरीही शिवसेनेने मुंबईभर ‘डिड यू नो’ची होर्डिंगबाजी सुरू केली आहे. टिष्ट्वटर, फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप या माध्यमातून त्यांच्या या ‘डिड यू नो’ला मुंबई काँग्रेस चोख उत्तर देणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. मुंबई काँग्रेसच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरून पालिकेतील सर्व घोटाळ्यांची माहिती देण्यात येणार आहे. ‘डिड यू नो’ रस्ते घोटाळा, खड्डे घोटाळा, रस्ते दुरुस्ती घोटाळा, टॅबलेट घोटाळा, नालेसफाई घोटाळा, डम्पिंग ग्राउंड घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, असे निरुपम यांनी सांगितले.>‘ऊठ मराठी माणसा जागा हो’ आपल्या प्रचार मोहिमेदरम्यान ‘उठ मराठी माणसा जागा हो’ असा संदेश टाकत, मनसेने पोस्टरच्या माध्यमातून मराठी माणसाला भावनिक आवाहन करण्याचे काम केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रंगलेल्या पोस्टरयुद्धावरील मुद्दे लवकरच निवडणुकीच्या प्रचारात दिसतील, यात शंका नाही.मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे, सपा, एमआयएम या राजकीय पक्षांमध्ये जोरदार चुरस रंगणार आहे. परिणामी या मुद्यावर कोण कोणावर कसे प्रहार करतो याकडे सर्वांचेच लक्ष आहे.