सांगली : एलबीटी अॅसेसमेंट तपासणी व सीए पॅनेल रद्द करण्यासाठी गुरुवारपासून सांगलीतील व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. तत्पूर्वी व्यापारी व उद्योजकांनी शहरातून मोटारसायकल रॅलीही काढली. यानिमित्ताने पुकारलेल्या सांगली बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्य शासनाकडून लेखी हमी मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा स्पष्ट इशारा व्यापारी संघटनेचे नेते समीर शहा यांनी दिला. सांगलीत व्यापारी एकता असोसिएशन, चेंबर आॅफ कॉमर्स, वसंतदादा, मिरज व गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत या संघटनांनी एलबीटीविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. अभय योजनेतील अॅसेसमेंट तपासणी व सीए पॅनेल रद्द करावे, व्यापाऱ्यांना बजाविलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात आदी मागण्यांसाठी महापालिकेला १५ दिवसांची डेडलाइनही देण्यात आली होती. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांचे बेमुदत उपोषण
By admin | Published: February 17, 2017 2:57 AM