नरेश रहिले, गोंदियाहातभट्टी, बनावट दारू व एक्साइज ड्युटी चुकवून दारूविक्री करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी गोंदिया पोलिसांनी ‘मिशन मोड’ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानात अवैध दारूविक्रेत्यांच्याच मुसक्या आवळल्या जाणार नाहीत, तर त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलिसांनाही शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. शिवाय, आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्री सुरू नाही, असे प्रमाणपत्र ठाणेदारांना दर महिन्याला द्यावे लागणार आहे.अवैध दारूविक्रीसंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी कठोर भूमिका घेत, दारूविक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याबरोबर, त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलिसांवरही कारवाईचा बडगा उचलला आहे. आमच्या बीटमध्ये किंवा ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्री होत नाही, असे प्रमाणपत्र बीट अंमलदाराला, ठाणेदाराला दरमहिन्याच्या १० तारखेला द्यावे लागणार आहे. याची खातरजमा केल्यानंतरच, उपविभागीय पोलीस अधिकारी हे ठाणेदाराने दिलेल्या प्रमाणपत्राला प्रमाणित करतील.
पोलिसांनाच दयावालागणार दारूबंदीचा पुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2016 5:22 AM