राज्यात ठिकठिकाणी गुरुवारी गणरायाला वाजतगाजत निरोप देण्यात आला. (सर्व फोटो - सुशील कदम)
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा भावपूर्ण घोषणात ढोल- ताशांच्या गजरात संपुर्ण महाराष्ट्रातील गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणपती बाप्पा मोरया... पुढल्यावर्षी लवकर या....अशा जयघोषात एक महाकाय गणेशमूर्ती विसर्जित केली जात असताना.
गिरगाव चौपाटीचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. गुलाल उधळत ढोल-ताशांच्या गजरात लालबाग ते गिरगाव चौपाटीपर्यंत निघालेली मिरवणूक.
मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाला गुरुवारी भावपूर्ण निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.
कित्येक आठवडे दडी मारलेल्या वरुणराजानेदेखील लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी हजेरी लावली. जवळपास महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर हा पाऊस झाल्याने जणू बाप्पाच पावल्याचा आनंद बळीराजाला झाला
गेल्या दहा दिवसांपासून गणेश भक्तांना सकारात्मक उर्जा व आनंद देणाऱ्या गणरायाला निरोप देतांना गणेशभक्त हळवे झाले असले तरी त्यांच्या जल्लोषाला उधाण आले होते.