२१व्या शतकाचा उंबरठा ओलांडण्याच्या संक्रमणावस्थेत साक्षेपी संपादक या नात्याने लोकमत परिवाराचा भाग बनलेल्या अरूण टिकेकरांचे १९ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले. टिकेकरांनी लोकमतमध्ये लिहिलेले निवडक लेख.
टिकेकरांनी लोकमतच्या मंथन पुरवणीत ३१ जुलै २०११ मध्ये लिहिलेला खालील लेख.
गुणवृद्धीसाठी धातूमिश्रण
मिश्रधातूमुळे गुणवृद्धी क रता येते,
हे कळाल्यानंतर नवनवे प्रयोग सुरू झाले.
हव्या त्या गुणाचा मिश्रधातू निर्माण क रण्यात
मानवानं यश मिळवलं, ही मोठीच क र्तबगारी होती.
या कि मयेमुळे सुई-टाचणीपासून अजस्त्र, अवाढव्य
विमानार्पयत मिश्रधातूचं साम्राज्य पसरलं.
सोनं-चांदी हे महागडे धातू.
त्यांच्यावर राजेरजवाडय़ांचा, सरदार-
मनसबदारांचा हक्क असावा, हे प्राचीन
आणि ऐतिहासिक काळांच्या
समाजरचनेनुसार वावगं नव्हतं. सोन्याचे
दागिने, चांदीची भांडी ही त्यांच्या दौलतीचा
हिस्सा होती. अन्य समाजघटकांनी
पितळ-तांब्याची भांडी वापरली, त्यांचे
आकार-प्रकार वर्णन क रता क रता एखादा
ग्रंथराजच तयार होईल. पितळ-तांब्यांच्या
आकाराबाबत रावबहादुर गुप्त्यांनी एक
मार्मिक निरीक्षण नोंदवलं आहे. या
भांडय़ांपैकीकाहींचे आकार
भोपळ्यासारखे, तर काही भोवरी कि ंवा
क मळासारख्या फु लासारखे. सन्यासी
लोकांनी धातूंच्या भांडय़ांचा त्याग के ला
आणि भोपळ्याचा क मंडलू वापरला, वडफ
णसाच्या पानांच्या पत्रवळी वापरल्या.
देवाची भांडी तांब्याची असावीत, असा
अनेक आग्रह असतो. तरीही पितळेची
भांडी वापरण्याचा अनेकांचा आग्रह
असतो. कारण पितळ चक चकीत
क रायला प्रयत्न खूप क रावा लागला, तरी
चक चकीत झाल्यानंतर ते सोन्यासारखे
पिवळेधमक दिसते. काशाची भांडी पितळी
भांडय़ाऐवजी वापरात आली. चार भाग
तांबे, एक भाग क थिल अशा मिश्रणानं
कासे तयार होतं, तर तीन भाग तांबे आणि
एक भाग जस्त यापासून पितळ तयार
होतं.
मिश्रधातूमुळे गुणवृद्धी क रता येते, हे
क ळून आल्यापासून गुणात्मक वाढीसाठी
मिश्रधातूतील टक्के वारीवर प्रयोग सुरू
झाले. क ठीण धातूत लवचिक पणा, क मी
क ठीण धातूत अधिक क ठीणपणा,
चक चकीत नसलेल्या धातूवर
ङिालाई..असे कि तीतरी नवे गुण असणारे
मिश्रधातू निर्माण के ले गेले. त्यांचा योग्य
वापर होऊ लागला. किं बहुना जो गुण
हवा, तसा मिश्रधातू निर्माण क रण्यात
मानवानं यश मिळवलं. ही मोठीच
क र्तबगारी होती. तिनं के लेली कि मया
अगणित म्हणता येईल, अशा प्रकारांत
आविष्कृ त झाली, त्यांची जंत्रीसुद्धा
अशक्य आहे. अक्षरश: सुई-टाचणीपासून
अजस्त्र, अवाढव्य विमानार्पयत
मिश्रधातूंचं साम्राज्य पसरलं. मेटॅलर्जी
(= धातूशास्त्र नावाचं वेगळं असं शास्त्रच
निर्माण झालं. कि त्येक उपयुक्त
शोधांसाठी हा ना तो धातू आवश्यक
ठरला. अगदी प्राचीन काळापासून. आज
ज्ञात झालेल्या आणि उपयोगात आणल्या
जाणा:या धातूंपैकीसात धातू असे आहेत
की, ते प्राचीन काळीही काही संस्कृ तींना
ज्ञात होते. सोनं (ाि.पू.6क्क् र्वष), तांबं
(ाि. पू. 42क्क् र्वष), रु पं (ाि.पू.4क्क्क्
र्वष), शिसं (ाि.पू.35क्क् र्वष), नस्त
(ाि.पू.175क् र्वष), लोह (ाि.पू.15क्क्
र्वष), पारा (ाि.पु.75क् र्वष),
पेसॉपोटेमिया, इजिप्शियन, ग्रीक आणि
रोमन या संस्कृ तींना या धातूंविषयी ज्ञान
होत गेलं.
अठराव्या शतकापासून मिश्रधातूंचा
जमाना आला, तसं रासायनिक प्रक्रि या
क रू न असे अनेक नवीन धातू तयार
क रण्याचे यशस्वी प्रयोग झाले की, विविध
उपयोगासाठी विविध मिश्रधातूंचं युग
निर्माण झालं. क ोबाल्ट (1735), निके ल
(1751), टंगस्टन (1783), युरेनिअम
(1789), टायटेनियम (1791),
क्र ोमियम (1797) हे तसेच अन्य धातू
नव्या नावानं ओळखले जाऊ लागले.
विशिष्ट कारणासाठी वापरण्यात येऊ
लागले. ‘इलेक्ट्रोप्लेटिंग’चा म्हणजे
एखाद्या मूळ धातूवर दुस:या एखाद्या
धातूचा वर्ख चढविण्याचा शोध
लागल्यापासून त्याचे उपयोगही वाढले.
उदाहरणार्थ- क्र ोमियम स्टेनलेस-स्टील
बनवण्यासाठी कामी आले. एक ोणिसाव्या
आणि विसाव्या शतकातही मिश्रधातू वा
धातू यांची संख्या वाढतच गेली.
उदाहरणार्थ- अॅल्युमिनियमचा शोध
1827 चा, तर जर्मेनियमचा 1886 चा.
पितळ, तांबं, कासं, स्टेनलेस स्टील
सारखं अॅल्युमिनियम आपल्या विशिष्ट
गुणांनी वापरात राहिलं. अॅल्युमिनियम
वजनानं हलकं आणि कि मतीत स्वस्त.
डब्बेवाल्यांचे उभट डबे अॅल्युमिनियमचे
का, याचं हे उत्तर.
या सर्वात अधिक उपयोगात येणारा
मिश्रधातू म्हणजे पोलाद किं वा स्टील.
एखादा घट्ट पदार्थ भट्टीत तापवून
वितळवणं आवश्यक असल्यास
वितळविलेला रस आटवणं, त्या रसातला
गाळ काढणं आवश्यक असल्यास तो रस
गाळून घेणं ही प्रक्रि या जमू लागल्यापासून
अनेक बाबी साध्य होऊ लागल्या. क स
वाढवता येऊ लागला. हिणक स काढता
येऊ लागला, त्यामुळे शुद्धतेचा आग्रह
धरता येऊ लागला. वितळवलेल्या धातूला
आकार देता येऊ लागला. त्याचे गोळे,
विटा, पत्रे (तेही क मी-जास्त जाडीचे)
क रता येऊ लागले. धातू तापलेला
असतानाच त्याला आकार देता येऊ
लागले. भट्टीत वितळलेल्या स्टीलच्या
ओतीव काम क रू न तयार के लेल्या वस्तू
उत्खननात ठिक ठिकाणी सापडल्या
आहेत. त्यावरू न स्टीलचं निर्माण निदान
ाि.पूर्व 4क्क्क् वर्षापूर्वीचं आहे, हे क ळून
आलं आहे. भट्टीतलं शुद्ध के लेलं लोह
(रॉट आयर्न आणि बीड (कास्ट आयर्न)
यांना एक त्रित वितळवण्याची प्रक्रि या
के लेलं स्टील चीनच्या हान् राजवंशानं
(ाि.पू.2क्2 ते ािस्तोत्तर 22क्)
ािस्ताजर पहिल्या शतकात निर्माण
के ल्याचा उल्लेख सापडतो. पुरातत्व
शास्त्रज्ञांना पूर्व आफ्रि के त 18क्क् अंश
सेल्सियसर्पयत तापमान वाढवून
कार्बनस्टील क रणारी भट्टी सापडल्याचेही
इतिहासात नमूद आहे.
औद्योगिक क्र ांतीनंतर तर आयर्नस्टी
ल उद्योग हा मोठा उद्योग बनला,
कारण स्टीलची जगभरातील मागणी
तेव्हापासून जी सतत वाढत गेली, ती
आजर्पयत कायम वाढतीच आहे. चीन
आणि भारत या दोन्ही देशांतील या
उद्योगाला प्रचंड महत्त्व आलं आहे.
स्टीलचे, स्टीलच्या पत्र्याचे, सळ्यांचे,
रु ळांचे नाना उपयोग पाहिल्यानंतर ते का
आलं असावं, याचा अंदाज येतो. आज
स्टील निर्माणासाठी लागणा:या भट्टयांतही
आणि प्रक्रि येतही विविधता आली आहे.
स्टीलमध्ये असलेली ताक द हेच अनेक
ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. एखाद्या व्यक्त ीला
आयर्न मॅन’ किं वा ‘स्टील मॅन’ म्हणण्याची
प्रथा पडली, याचं कारण वेगळं सांगायला
हवं का?
भारतानं लोह-पोलाद (आयर्न आणि
स्टील) उद्योगात घेतलेली भरारी पाहायला
दादाभाई नौरोजी आज हवे होते, असं
वाटतं. या उद्योगाची भारतात मुहूर्तमेढ
रोवली ती जमशेटजी नसरवानजी टाटा
यांनी. जमशेटपूरला स्टील प्लँट उभा
क रण्याचा त्यांचा मनोदय होता,
जुळवाजुळव सुरू झाली होती. अशावेळी
इंग्लंडमध्ये मुंबईतल्या एका कं पनीचे
व्यापारी प्रतिनिधी म्हणून वास्तव्यास
असलेल्या दादाभाई नौरोजी यांनी
जमशेटजी टाटांना लिहिलेलं एक पत्र
काही वर्षापूर्वी वाचायला मिळालं होतं.
त्यात दादाभाईंनी जमशेटजींचं मन
वळवण्याचा प्रयत्न के लेला होता. जड
उद्योग हे भारतीयांना ङोपणारे नाहीत,
लघुउद्योग किं वा व्यापार हेच
कि फ ायतशीर आहे, हे पटविण्याचा
दादाभाईंचा सल्ला जमशेटजींनी मानला
नाही, हे त्यांनी योग्यच के लं, असंच आज
म्हणावं लागेल. ‘टाटा स्टील’ हा जागतिक
ब्रँड आज झाला आहे.
तांबं, पितळं, जस्त, क थिल, कासं या
धातू भारतीयांच्या जीवनात
अनन्यसाधारण स्थान मिळवून बसल्या
आहेत. आता महानगरातील उच्चभ्रू
कु टुंबामधून या धातूंचं जवळपास
उच्चटन झालं आहे. तरीही भारताने
ऐतिहासिक काळापासून काही शहरांची
आणि गावांची ख्याती या धातूंची भाडी
बनविण्यासाठी आहे. स्वयंपाकासाठी
लागणा:या भांडय़ांपासून ते देवपूजेसाठी
लागणा:या वस्तूंर्पयत धातूंची भांडी वा
वस्तू बनवण्याची कि त्येक गावांची
खासीयत आजर्पयत टिकून आहे. तांबं
आणि जस्त यापासून होणारं पितळ, तर
तांबं आणि क थिल यापासून होणार कासं.
पितळी भांडय़ांना कल्हई लावून तीच भांडी
स्वयंपाक घरात वापरण्याची
कालपरवार्पयत पद्धत होती. त्यामुळे
क ल्हई लावण्याचा व्यवसाय क रणारे
दिसत. आता हा व्यवसाय विस्मृतीत
गेलेल्या व्यवसायात मोडतो. काही गावांत
क ल्हई क रणारे अजूनही आहेत, तेथे
क ल्हई के लेली भांडी वापरली जातातही.
एक ध्यानात घेण्यासारखं आहे. ते म्हणजे
स्वयंपाकाची तसंच पिण्याचं पाणी भरू न
ठेवण्याची, पाणी पिण्याची भांडी अतिशय
साधी असतात. कारण उघड आहे. ती
स्वच्छ क रताना त्रस होऊ नये.
क च्छभूज या ठिकाणची तसंच
जयपूर, ग्वाल्हेर, रायपूर, तंजापूर, क ोचीन
येथील चांदीची भांडी विशेष नावाजलेली.
चांदीचे तबक म्हणजे म्हैसूरचंच, अशी
ख्याती. मिन्याची भांडी जयपूर- दिल्लीची.
तांब-चांदी, पितळ-चांदी असं जोडकाम
जे पत्रीकाम म्हणून ओळखलं जातं-
तंजोरची खासीयत. लोखंडाच्या
भांडय़ांवर बारीक नक्षीकाम- क फ्तकारी
म्हणतात त्याला, हे जयपूरच.ं लाख
भरलेली नक्षीची भांडी मुरादाबादचीच.
बिदरी काम मात्र अनेक शहरांत पूर्वीपासून
होताना दिसतं. प्रत्येक शहराच्या कामातही
वेगळेपणा आढळतो. समया, कं दिल, अन्य
प्रकारचे दिवे काश्मीरपासून
क न्याकु मारीर्पयत होतात. देवपूजेच्या
भांडय़ांचे आकार-प्रकार मात्र वेगवेगळ्या
ठिकाणी वेगवेगळे असतात. महाराष्ट्रात
मुंबई, पुणो, नाशिक , सोलापूर तांबा
िपतळेचं सामान भरपूर प्रमाणावर बनत
असे. हुबळी या क र्नाटकातील गावाचीही
ती ख्याती. नाशिक येथील पाणी पिण्याची
भांडी आणि देवपूजेची भांडी पुण्यातील
भांडय़ांपेक्षा अधिक सुबक आणि सुडौल.
बाहेरू न नाशकात आलेल्यांना नाशकात
मिळणारी भांडी, देवपूजेचं सामान विक त
घ्यायचा मोह होतोच. ‘‘पुणो शहरात तीन
(हजारांपासून) ते चार हजारांर्पयत तांबट
आहेत व येथे दरसाल पंचवीस लक्षाचा
माल तयार होतो.’’ असं रावबहादूर गुप्ते
(1889 मध्ये) म्हणतात. तांबट हे लोक
मोठाली भांडी क रणारे. ओतारी हे लहान
लहान भांडी ओतात. तिसरे चरक वाले. हे
भांडय़ांना क ल्हई क रतात.
बिदरी हे बेदर शहरावरू न पडलेलं
नावं. बेदर हैदराबादच्या दक्षिणोला 100
कि लोमीटर अंतरावर असेल. दंतक था
अशी सांगतात की, ािस्तपूर्व 400 र्वष
बेदर नावाच्या हिंदू राजानं वसविलेल्या या
गावी त्यानं स्वत:च्या देवपूजेसाठी काही
सामान खास क रवून घेतलं. त्या राजाचं
नाव गावाला मिळालं, एवढंच नव्हे, तर
देवपूजेच्या अशा खास वस्तूंनाही बिदरी
काम असंच म्हटलं जाऊ लागलं.