पुणे : हमखास जोरदार पावसाचे जून आणि जुलै हे महिने लोटले. आषाढ संपून आता श्रावणातील रिमझीम सरी बरसण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे आता पाऊसकाळ संपला, असे काही नाही. कारण हवामान विभागाने दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून त्यानुसार देशात आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये १०० टक्के पाऊस पडेल, अशी सुखद वार्ता आहे.
मान्सून मिशन मॉडेलच्या अंदाजानुसार पावसाळाच्या दुसºया टप्प्यात आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये देशात ९९ टक्के पावसाची शक्यता आहे़ मॉडेल एरर ८ टक्के दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे दोन महिन्यांत पाऊसमान हे सर्वसाधारण (९४ ते १०६ टक्के) राहण्याची शक्यता ४५ टक्के इतकी आहे़ देशात आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये सरासरीच्या ४९ टक्के पाऊस पडतो़ यापूर्वी हवामान विभागाने जून ते सप्टेंबर दरम्यान ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज दिला होता़ सध्या प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ तटस्थ दिसत आहे़ मान्सून मिशन प्रोजक्टनुसार ही परिस्थिती संपूर्ण मान्सून काळात कायम राहणार आहे़ त्याचबरोबर भारतीय महासागरात अनुकुल स्थिती राहील, त्यामुळे देशात इथूनपुढचे दोन महिनेही चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
अद्याप देशभरात ९ टक्के पाऊस कमी, ३२ टक्के क्षेत्र प्रभावितमॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाज उत्साहवर्धक असला तरी गेल्या दोन महिन्यात देशभरात सरासरीच्या ९ टक्के पाऊस कमी बरसला आहे़ १ जून ते १ आॅगस्ट दरम्यान देशभरात ३६ हवामान विभागापैकी १३ विभागात पावसाचे प्रमाण कमी असून त्यामुळे देशातील ३२ टक्के क्षेत्र प्रभावित झाले आहे़ ३ विभागात सरासरीपेक्षा २० टक्क्याहून अधिक पाऊस झाला असून ते फक्त ९ टक्के क्षेत्र आहे़ २० हवामान विभागात +१९ ते -१९ टक्के पाऊस झाला असून देशातील एकूण क्षेत्रापैकी ५९ टक्के भागात सर्वसाधारण पाऊस झाला आहे़मराठवाडा विदर्भात कमी पाऊसआतापर्यंत महाराष्ट्रातील कोकणात २९ टक्के आणि मध्य महाराष्ट्रात ३४ टक्के जादा पाऊस झाला असून मराठवाड्यात सरासरीच्या २५ टक्के कमी आणि विदर्भात ९ टक्के कमी पाऊस झाला आहे़खरीपाच्या ८२ टक्के पेरण्या पूर्णराज्यात खरीपाच्या ११५.७९ लाख हेक्टरवरील (८२ टक्के) पेरणी व लागवड उरकली आहे. भात, ज्वारी व नाचणीची सरासरीच्या निम्मीही पेरणी झालेली नाहीत. त्यामुळे यंदा हे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मूग, तूर आणि उडीदाचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. -