शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

मुंबई उपनगराला पावसाने झोडपले, आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 4:48 AM

सोमवारी रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असतानाच, मुंबईच्या उपनगरातही पावसाने तुफान हजेरी लावली.

मुंबई : सोमवारी रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असतानाच, मुंबईच्या उपनगरातही पावसाने तुफान हजेरी लावली. मुंबई उपनगराच्या तुलनेत मुंबई शहरात मात्र पावसाचे प्रमाण कमी होते. मुसळधार पाऊस आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबईच्या उपनगरातील वाहतूक संथ झाली होती. विशेषत: ठिकठिकाणी झालेल्या वाहतूककोंडीमुळे मुंबईकर बेजार झाले होते. मंगळवारीही मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला भारतीय हवामान शास्त्र विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.मुंबई शहरात फोर्ट, कुलाबा, मरिन ड्राइव्ह, भायखळा, महालक्ष्मी, वरळी, दादर, लोअर परळ परिसरात पावसाचा जोर कमी होता. कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, साकीनाका, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, बोरीवली आणि गोरेगाव परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. पावसादरम्यान दुर्घटनाही घडल्या असून, सांताक्रुझ पूर्वेकडील कलिना विद्यापीठाच्या परिसरात घनकचरा खात्याच्या वाहनावर विजेचा खांब पडून क्लीनरला किरकोळ मार लागला. मोहम्मद शोएब अन्सारी असे जखमी क्लीनरचे नाव असून, घटनास्थळीच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मुलुंड पश्चिमेकडील वीणानगर परिसरातील नाल्यात पडलेल्या एका मुलाला स्थानिकांनी सुरक्षितरीत्या बाहेर काढले.शहरात ५, पूर्व उपनगरात २, पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ८ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. शहरात ६, पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण १० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात ११, पूर्व उपनगरात २२, पश्चिम उपनगरात १३ अशा एकूण ४६ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.।राज्यात दम‘धार’, तीन दिवस पावसाचेपश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह उत्तर व मध्य भारतात दमदार पाऊस कोसळू लागला आहे. सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने नद्यांना पूर आले आहेत. धरणसाठ्यात समाधानकारक वाढ झाली असून अनेक धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खरीप पिकांच्या वाढीला हा पाऊस उपयोगी असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. अजून तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़>कोकण, कोल्हापुरात धुवाधारकोकणासह कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाला. सिंधुुदुर्गमध्ये गडनदी, जानवली नद्यांना पूर आला आहे. रत्नागिरीतील मिºया-पंधरा माड कोंड व संपूर्ण मिºया गावाच्या किनाºयाला सलग चौथ्या दिवशी भरतीच्या अजस्त्र लाटांनी जोरदार तडाखा दिला. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, आजरा, शाहूवाडी, कागल, भुदरगड, पन्हाळा, राधानगरी, चंदगड तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला असून पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. सांगली, सातारा जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला.>मराठवाड्यात संततधारमराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सोमवारी दिवसभर संततधार होती. औरंगाबादमध्ये दिवसभर रिपरिप होती. हिंगोलीत १२ दिवसांपासून पाऊस आहे. बीड, नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला़ परभणीत ओढ्या-नाल्यांना प्रथमच पाणी आले. लातूर, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात रिमझिम सुरू होती़विदर्भात अतिवृष्टीविदर्भात गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. गडचिरोलीमध्ये सकाळी संपलेल्या २४ तासात ७०.६ मिमी एवढ्या उच्चांकी पावसाची नोंद झाली. धानोरा, चामोर्शी, मुरचेरा, एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात अतिवृष्टी झाली. अहेरी तालुक्यात प्राणहिता नदीत डोंगा उलटून व्यंकटेश शंकर सिडाम (२५) हा युवक वाहून गेला. गोंदियातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पुन्हा पाणी शिरले.धरणांमधून विसर्गनाशिकमध्येही पावसाचा जोर आहे. गंगापूर धरणात ७५ टक्के साठा झाला असून गंगापूरसह दारणा, चणकापूर, पुनद या चार धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.>१७ जुलै रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.१८ जुलै रोजी कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.१९ जुलै कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.२० जुलै रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.>राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊसबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तसेच दक्षिण गुजरातमध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र यामुळे सध्या महाराष्ट्रात सर्वदूर दमदार पाऊस पडत आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील, राज्यात नंदूरबार वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.- डॉ़ ए़ के. श्रीवास्तव, वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ, पुणे.

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटSatara areaसातारा परिसरkonkanकोकणMumbaiमुंबईKurlaकुर्लाGhatkoparघाटकोपरGadchiroliगडचिरोली