मुंबई : दरवर्षी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना योजनेतर (प्लॅन) व योजनेअंतर्गत (नॉनप्लॅन) अशा दोन प्रकारे त्याची विभागणी होते. अर्थसंकल्प हा योजनेतर तरतुदींवर सादर केला जाण्याची प्रथा होती. मात्र प्रशासकीय सुधारणा आयोग व डॉ. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय तज्ञ समितीने आणि १२ व्या वित्त आयोगाने अर्थसंकल्पातील प्लॅन, नॉनप्लॅन या दोन्ही योजनांच्या खर्चाचे एकत्रिकरण करण्याची शिफारस केली होती. नियोजन आयोगाचे नीती आयोगात रूपांतर झाल्यानंतर १२ वी पंचवार्षिक योजना ३१ मार्च २0१७ रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे २0१७-१८ या आर्थिक वर्षापासून प्लॅन, नॉनप्लॅन खर्चाचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे.यामुळे राज्य शासनाला आता भांडवली खर्चावर लक्ष केंद्रीत करता येईल. योजनांतर्गत तरतूद केवळ एकत्रित अर्थसंकल्पाच्या २५ टक्के एवढीच असली तरी सध्या तेवढया तरतुदींकडेच लक्ष देण्यात येत होते. नव्या बदलामुळे आता प्रत्येक विभागास त्यांना प्राप्त झालेली तरतूद उपयोगात आणण्याची लवचिकता प्राप्त होईल. तसेच विभागाला ६0 वर्षात निर्माण झालेल्या मालमत्तांची देखभाल करण्याकडे यापूर्वी लक्ष देता आले नव्हते ते आता शक्य होईल.अशा पद्धतीने दोन्ही खर्चांचे एकत्रिकरण हा मोठा बदल असून याचे चांगले परिणाम नजीकच्या काळात दिसतील असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.२0१७-१८ मध्ये नवीन पद्धतीनुसार एक़ूण खर्चाची रक्कम ७७,१८४ कोटी रूपये असली तरी २0१६-१७ च्या योजनाअंतर्गत ५६,९९७ कोटी रूपयांच्या तुलनेत २0१७-१८ चा एकूण खर्च ६२,८८४ कोटी आहे. मार्च २0१६ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना २,२0,८१0 कोटी रूपयांची महसूली जमा अपेक्षित होती. वर्षभरातील महसूल संकलनाचा कल लक्षात घेतल्यानंतर सुधारीत अंदाज २,२0,0११ कोटी रूपये निश्चित केला गेला. २0१७-१८ च्या अर्थसंकल्पात महसूली जमा २,४३,७३७ कोटी व महसूली खर्च २,४८,२४८ कोटी अंदाजित केला आहे. परिणामी ४,५११ कोटी रूपये महसूली तूट निर्माण होणार आहे. २0१७-१८ चा कार्यक़्रम कृषी व संलग्न सेवा७,0३५.७३ग्रामीण विकास२,६७१.८३विशेष क्षेत्र कार्यक्रम२११.३0पाठबंधारे पूर नियंत्रण८,७0१.७२ऊर्जा७,८९२.१४उद्योग व खाण४५५.३२परिवहन११,0३९.२४विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण१८५.९0सामान्य आर्थिक सेवा८८६.११सामाजिक सामुहिक सेवा३१,९८८.0५सामान्य सेवा३,८१८.५७इतर कार्यक़्रम२,२९८.0८एक़ूण ७७,१८४
अर्थसंकल्पाची कार्यपद्धती बदलली
By admin | Published: March 19, 2017 1:38 AM