शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुसाट...

By admin | Published: June 09, 2017 2:01 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाचे १० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाचे १० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे मेट्रोच्या-३च्या भुयारीकरणाच्या कामाला आॅक्टोबरपासून सुरुवात करण्यात येईल, अशी माहितीही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली असून, सिकेंट पाईल्सचे काम प्रगतिपथावर असल्याचे म्हटले आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची स्थापना पहिला भुयारी मार्ग कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी झाली आहे. या मार्गाची लांबी ३३.५ किलोमीटर असून, यातील २७ स्थानके शहरातील प्रमुख ३० शैक्षणिक संस्था, ३० मनोरंजन स्थळे, ६ व्यापारी केंद्रे आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमानतळ यांना जोडणार आहेत.मुंबईची उपनगरीय रेल्वे ही गर्दीने भरून वाहत असते. १ हजार ७८० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असताना उपनगरीय रेल्वेतून सुमारे पाच हजार प्रवासी प्रवास करतात. परिणामी, हानी होण्याची भीती असते. त्यामुळे शहराला पर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज असून, मेट्रो-३ प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण म्हणजेच गर्दी १५ टक्क्यांनी कमी होणे अपेक्षित आहे. २०३१साली १७ लाख प्रवासी मेट्रो-३मधून प्रवास करू शकतील असा अंदाज आहे.प्रकल्पाची किंमत २३ हजार १३६ कोटी आहे. जायका (जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) ही संस्था १३ हजार २३५ कोटी इतके कर्ज माफक व्याजदराने उपलब्ध करून देईल. प्रकल्पासाठीचा उर्वरित निधी केंद्र, राज्य आणि इतर भागधारकांकडून प्राप्त होईल.मेट्रो-३मुळे कफपरेड ते विमानतळ हे अंतर पार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक कपात होईल.प्रकल्पाची सद्य:स्थितीमेट्रो ३च्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले असून, कामाला सुरुवात झाली आहे.प्रकल्पाचे काम १० टक्के पूर्ण झाले आहे.सिकेंट पाईल्सचे काम प्रगतिपथावर आहे.आझाद मैदान, कफ परेड, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, नया नगर, विद्यानगरी, सहार रोड, पाली मैदान, सारीपुत नगर येथे लाँचिंग शाफ्टच्या कामाला सुरुवात झाली आहे.भुयारीकरणाच्या कामाची सुरुवात आॅक्टोबरपासून होणार.रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग व टे्रन कंट्रोल इत्यादी प्रणालीविषयक कामाचे कंत्राट जून २०१८पर्यंत देणे अपेक्षित आहे.आरे ते वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंतच्या प्रकल्पातील पहिला टप्पा सप्टेंबर २०२०पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.वांद्रे-कुर्ला संकुल ते कफ परेडपर्यंतचा प्रकल्पातील दुसरा टप्पा मार्च २०२१पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.तंत्रज्ञान - टे्रन्सकम्युनिकेशन बेस टे्रन कंट्रोल यंत्रणेमुळे गाडीची नियमितता पाळता येईल.रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यंत्रणेमुळे ३० टक्क्यापर्यंत ऊर्जेची बचत होईल.स्थानकेप्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्लॅटफार्म स्क्रीन डोअर्सची सुविधालिफ्ट आणि सरकत्या जिन्यांसाठी देखभाल सूचक यंत्रणेचा समावेश राहील. या यंत्रणेमुळे देखभाल करणे सोईस्कर होईल.स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणेमुळे स्पर्शरहित महसूल जमा होणे शक्य होईल.पर्यावरणीय फायदेप्रकल्पामुळे दहा हजार मेट्रीक टन इतके कार्बन डायआॅक्साइड उत्सर्जन कमी होईल.५.५४ लाख वाहनांच्या फेऱ्या कमी होतील. परिणामी, २.९५ लाख लीटर इंधनाची दररोज बचत होईल.मेट्रो-३ ही मुंबईसाठी लाइफलाइन आहे. मेट्रोचे काम विभागण्यात आले आहे. उपनगरीय रेल्वेच्या गर्दीला ही मेट्रो पर्याय असणार आहे. भूमिगत वाहिन्यांचा अभ्यास करून प्रकल्प आखला आहे. मेट्रो प्रकल्पाचे व्यवस्थापन चोखरीत्या करण्यात आले आहे. कामावेळी निघणारी माती, चिखल याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. प्रकल्पामुळे कोठेही सिमेंटचा कचरा दिसणार नाही. मुंबई स्वच्छ राहील याची काळजी घेतली जात आहे. जिथे कायम वाहतूककोंडी होते; तेथील कामाचा भाग आणखी मजबूत असणार आहे. बोगदा मार्गावर गाइड वॉलचे काम केले जाईल. प्रकल्पाच्या कामादरम्यान आतापर्यंत १ हजार ७४ झाडे तोडण्यात आली आहेत. पण पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. सध्या जे खोदकाम सुरू आहे; ते स्थानकाच्या कामापुरते मर्यादित असून, यानंतरचे काम जमिनीखाली होणार आहे.- सुबोध कुमार गुप्ता, संचालक, प्रकल्प