शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

मेट्रो-३ रखडणार!

By admin | Published: July 08, 2017 4:02 AM

गोरेगावच्या आरे वसाहतीतील ३३ हेक्टर भूखंड ना विकास क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव शिवसेनेने पालिका महासभेत फेटाळून

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगावच्या आरे वसाहतीतील ३३ हेक्टर भूखंड ना विकास क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव शिवसेनेने पालिका महासभेत फेटाळून भाजपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुंग लावला आहे. हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी आणण्यास भाजपाला तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आठ जागांमधून आरे वसाहतीची निवड करण्यात आली. त्यानुसार गोरेगाव पूर्व येथील आरे वसाहतीतील परजापूर आणि वेरावली येथील ३३ हेक्टर्स भूखंड निश्चित करण्यात आला आहे. तसेच प्रस्तावित विकास आराखड्यात या भूखंडावर कारशेडचे आरक्षण सुचविण्यात आले. मात्र आराखडा रखडल्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मागणी करताच या भूखंडाला ना विकास क्षेत्रातून वगळण्यासाठी भाजपाची धावपळ सुरू झाली. आरे कॉलनी हा मोठा हरित पट्टा असल्याने ही जागा कारशेडला देण्यास शिवसेना, मनसेने विरोध केला आहे. त्यामुळे कारशेडसाठी प्रस्तावित भूखंड ना विकास क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव सुधार समितीपाठोपाठ पालिका महासभेतही फेटाळण्यात आला. शिवसेनेकडून भाजपाला शहपालिका निवडणुकीच्या काळात वचननाम्यात या प्रकल्पाचे आश्वासन भाजपाने मुंबईकरांना दिले आहे. ते करण्याचे आव्हान भाजपा नेत्यांसमोर आहे. मात्र आरे कॉलनीतील जागा मेट्रो प्रकल्प ३च्या कारशेडसाठी सोडण्यास शिवसेनेचा विरोध आहे. समान संख्याबळ असूनही विरोधकांना हाताशी धरून शिवसेनेने भाजपाला शह देण्यास सुरुवात केली आहे. प्रस्ताव पुन्हा नामंजूर झाल्याने नियमांनुसार आता तीन महिन्यांनंतरच हा विषय प्रशासन पटलावर आणता येईल.