शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

‘मेट्रो-३’चे काम आॅक्टोबरपासून

By admin | Published: August 25, 2016 6:05 AM

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गाच्या बांधकामासाठी बुधवारी चार कंत्राटदारांसमवेत करार केला.

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गाच्या बांधकामासाठी बुधवारी चार कंत्राटदारांसमवेत करार केला. या चार कंत्राटदारांना मेट्रोचे काम सहा टप्प्यांत विभागून देण्यात आले आहेत, तर एका कंत्राटदारासमवेत लवकरच या संदर्भातील करार करण्यात येणार आहे. मेट्रो ३ चे काम आॅक्टोबर महिन्यापासून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली, तसेच शासकीय जमिनीपैकी ९० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>पॅकेज १ : २९८८.५३ कोटीएल अँड टी व एसटीईसी समूह, स्थानके: कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौकपॅकेज २ : २५२१.८९ कोटीएचसीसी-एमएमएस समूह, स्थानके: सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँटरोडपॅकेज ३ : २५५७.८४ कोटीडोगस-सोमा, स्थानके: मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, मेट्रो स्टेशन, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक व वरळीपॅकेज ४ : २८३०.१० कोटीसीईसी-आयटीडी, सीईएम-टीपीएल समूह, स्थानके: सिद्धीविनायक, दादर, मेट्रो व शीतलादेवीपॅकेज ५ : २८१७.०२ कोटीजे.कुमार सीआरटीजी, स्थानके: धारावी, बीकेसी मेट्रो, विद्यानगरी, सांताक्रुझपॅकेज ६ : २११८.४० कोटीजे. कुमार-सीआरटीजी, स्थानके: सीएसआयए, सहार रोड, सीएसए-आंतरराष्ट्रीयपॅकेज ७ : २२८१.४५ कोटीएल अँड टी, एसटीईसी समूह, स्थानके: मरोळनाका, एमआयडीसी, सीप्झ>पावसाळा संपण्याची प्रतीक्षा...मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी याबाबत सांगितले की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पाचा एकूण खर्च १८ हजार ११४.९ कोटी एवढा आहे. मेट्रो ३ च्या सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गाचे बांधकाम सुरू करण्याकरिता आम्ही पावसाळा संपण्याची प्रतीक्षा करत आहोत. मेट्रो ३ मुंबईच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला जोडणार आहे. नरिमन पॉइंट, वांद्रे-कुर्ला संकुल, विमानतळ आणि सीप्झसारखी मोक्याची ठिकाणे मेट्रोमुळे जोडली जाणार आहेत. शिवाय काळबादेवी, वरळी, प्रभादेवी आणि अंधेरी, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी ही ठिकाणेही जोडली जाणार आहेत.