लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग ३ च्या भुयारी स्थानकांच्या बांधणीचे काम नियोजित वेळेनुसार सुरू असल्याची घोषणा शुक्रवारी मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनद्वारे करण्यात आली. सातही पॅकेजेसच्या कास्टिंग यार्ड व स्थानक बांधणीची कामे जोमाने सुरू आहेत. नयानगर, आझाद मैदान आणि पाली मैदान येथील टनेल बोअरिंग मशीन्स (टीबीएम)च्या लाँचिंग शाफ्ट्सची कामेही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. अन्य ठिकाणच्या लाँचिंग शाफ्ट्ची कामेही जोमाने सुरू असून, दादर येथील सांडपाण्याची वाहिनी योग्य त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाच्या संपूर्ण कामाचा आढावा व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी घेतला. त्या म्हणाल्या, कामांची प्रगती समाधानकारक असून २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. आॅक्टोबर २०१७ मध्ये टीबीएमच्या साहाय्याने भुयार खोदण्याचे काम सुरू होणार आहे.
मेट्रो-३ च्या कामाला वेग
By admin | Published: July 15, 2017 2:14 AM