शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मेट्रो ऐतिहासिक वारशाच्या मुळावर

By admin | Published: May 01, 2017 3:26 AM

पुणे शहराच्या मध्यभागातून मेट्रो भूमिगत असली तरी भूमिगत स्थानकांसाठी इमारती पाडाव्या लागणार आहेत. मामलेदार कचेरी

सुषमा नेहरकर-शिंदे / पुणेपुणे शहराच्या मध्यभागातून मेट्रो भूमिगत असली तरी भूमिगत स्थानकांसाठी इमारती पाडाव्या लागणार आहेत. मामलेदार कचेरी आणि खडकमाळ आळी पोलीस ठाण्याचाही यामध्ये समावेश असून आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची समाधी आणि त्यांच्या शौर्याची साक्ष देणारे पिंपळाचे झाडही धोक्यात येणार आहे. सन १८३२ मध्ये खडकमाळ येथील मामलेदार कचेरीत उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली. लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी यासाठी इंग्रजांनी त्यांचा मृतदेह येथील पिंपळाच्या झाडावर तीन दिवस लटकवून ठेवला. हेच ‘पिंपळाचे झाड’ आता पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटदरम्यान होणाऱ्या मेट्रा मार्गावरील स्टेशनसाठी अडथळा ठरत आहे. ऐतिहासिक वारसा असलेले हे झाड वाचवायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनीच्या वतीने पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हा मेट्रो मार्ग १६.५८ किलोमीटरचा असून, यात ११.५७ किलोमीटर मेट्रो जमिनीवरून (एलिव्हेटेड) आहे. सुमारे सव्वापाच किलोमीटर मेट्रो भुयारी (अंडर ग्राऊंड) असणार आहे. या सोळा किलोमीटरच्या अंतरामध्ये एकूण १५ स्टेशन असून,  ६ स्टेशन भूमिगत असणार आहेत.  या मार्गाचा डीपीआर तयार झाला आहे. त्यानुसार आता प्रत्यक्ष  जो मार्ग निश्चित करण्यात आला  तेथे जाऊन मेट्रोचे अधिकारी पाहणी करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यावरून किंवा भुयारी मार्ग व स्टेशनसाठी किती जागा लागेल, स्टेशनच्या बाहेर पार्किंगसाठीची  जागा आदी बाबत अत्यंत सूक्ष्म  सर्व्हे सुरू आहे.  नागपूर येथे महामेट्रोच्या वतीने अनेक मोठ्या झाडांचे रिप्लँटिंग करण्यात आले. परंतु या ऐतिहासिक पिंपळाच्या झाडाची वाढ पूर्ण  झाली असून, अत्यंत जुने झाले  आहे. त्यामुळे रिप्लँटिंग करणेदेखील शक्य नाही. याबाबत विविध तांत्रिक गोष्टींचा तपास करण्यासाठी महामेट्रोच्या वतीने तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे काम सुरू आहे. यामध्ये शक्यतो झाडाला कोणताही धक्का न लावताच हे काम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.असा आहे या ‘पिंंपळा’चा इतिहास...१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उत्रोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजी नाईक यांना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळकोठडीत त्यांना ठेवण्यात आले. त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजींची सर्व हकिकत लिहून ठेवली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारे पहिला नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ रोजी वयाच्या ४१व्या वर्षी हसत हसत फासावर चढले. इतरांना दहशत बसावी म्हणून त्यांचा मृतदेह कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवला होता. झाडाचे काय करायचे मोठा प्रश्न...भूमिगत ६ स्टेशनपैकी एक स्टेशन खडकमाळ येथील मामलेदार कचेरीच्या जागेवर असणार आहे. या स्टेशनचे काम पूर्ण होईपर्यंत किमान तीन ते चार वर्षांसाठी येथील मामलेदार कचेरी, खडकमाळ पोलीस स्टेशनसह सर्व कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार आहे. स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर ही जागा पुन्हा पूर्ववत करून येथे नव्याने कार्यालयाचे काम करण्यात येणार आहे. येथेच उमाजी नाईक यांची समाधी व हे ऐतिहासिक झाडदेखील आहे. समाधीचे काम नव्याने करता येऊ शकते, परंतु झाडाचे काय करायचे असा मोठा प्रश्न महामेट्रोसमोर आहे.