मुंबई : मुंबई मेट्रोची भाववाढ पुन्हा टळली आहे. मेट्रो भाववाढीच्या याचिकेवरची सुनावणी १२ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशातील तांत्रिक बाबी सुधारल्याचे एमएमआरडीए आणि रिलायन्सने न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. कर्णिक यांना शुक्रवारच्या सुनावणीवेळी सांगितले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावित भाडेवाढीसंदर्भात उच्च न्यायालयाला जलदगतीने सुनावणी घेण्याचे निर्देश दिल्याचेही एमएमआरडीएच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले.प्रस्तावित भाडेवाढ योग्य आहे, हे सांगत मुंबई मेट्रो वन लिमिटेडने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. १ डिसेंबर २०१५पासून मेट्रोच्या भाड्यात ५ रुपये वाढ करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वनने घेतला. या निर्णयाविरुद्ध एमएमआरडीएने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (प्रतिनिधी)
मेट्रोची भाडेवाढ १२ एप्रिलपर्यंत टळली
By admin | Published: March 19, 2016 2:14 AM