रेल्वेचाही हिरवा कंदील : तिकीटदराचा गुंता कायम
मुंबई : गेले अनेक महिने सुरक्षा चाचणीच्या फे:या व तपासणी, सुधारणा, पुन्हा चाचण्या अशा चक्रात अडकलेल्या महानगरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो-1 रेल्वेला अखेर रेल्वे मंत्रलयाच्या सुरक्षा आयुक्तालयांकडून हिरवा कंदील मिळाला. येत्या काही दिवसांत ती प्रत्यक्षात धावण्याची शक्यता आहे. वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावरील 11.4क् किलोमीटर अंतराचा हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र रेल्वे मंत्रलयाच्या सुरक्षा आयुक्तालयांकडून ‘एमएमओपीएल’ कंपनीला देण्यात आले आहे.
पाच वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या
मेट्रो-1चे बहुतांश काम गेल्या 1 मे रोजी पूर्ण झाले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरक्षा चाचण्या घेण्यात येत होत्या. आयुक्तालयाकडून सुचविण्यात आलेल्या दुरुस्ती, रेल्वे व स्टेशन परिसरातील सुविधांची पूर्तता करून विविध पातळ्यांवर पुन्हा चाचण्या घेतल्या जात होत्या. एप्रिलमध्ये रेल्वेच्या वेग, नियंत्रणाबाबत विभागाकडून आलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने अंतिम चाचण्या घेऊन अहवाल बनविला होता. त्याबाबतचे प्रमाणपत्र सुरक्षा आयुक्तालयाकडून 22 मे रोजी कंपनीला पाठविण्यात आले. त्यात प्रति तासाला अधिकाधिक सरासरी 5क् किमी वेग मर्यादेला मान्यता देण्यात आल्याचे सूत्रनी सांगितले. प्रमाणपत्र मिळाले असले तरी तिकीट दराचा गुंता अद्याप कायम आहे. राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या दरापेक्षा अधिक वाढ मिळविण्यास रिलायन्स ठाम असल्याने वाद कायम राहिला आहे. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या मेट्रोसाठी किमान 9 ते 13 रुपये दराला मंजुरी आहे. रिलायन्स मात्र किमान 22 ते कमाल 33 रुपये दरासाठी आग्रही आहे. (प्रतिनिधी)
च्मेट्रो-1साठी सुरवातीला 2, 356 कोटी खर्च ग्रहित धरण्यात आलेला होता. मात्र काम रेंगाळल्याने हा आकडा 4,321 कोटीपर्यत पोहचला. त्यामुळे मेट्रोचे तिकीट दर वाढविण्याची मागणी एमएमओपीएलकडून करण्यात आली होती.
च्त्यानुसार गेल्यावर्षी 5 सप्टेंबरला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्वी निश्चित केलेल्या किमान 6 ते कमाल 1क् पर्यतच्या दरामध्ये वाढ केली आहे.