शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

मेट्रोचा लोखंडी पिल्लर दुचाकीवर पडल्यानं दोघे जखमी, मेट्रो रेल्वेच्या अभियंत्यांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 10:59 PM

मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी वापरला जाणारा लोखंडी कॉर्टर पिलर दुचाकीवर पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. तिची सासूही या अपघातात जखमी झाली.

नागपूर : मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी वापरला जाणारा लोखंडी कॉर्टर पिलर दुचाकीवर पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. तिची सासूही या अपघातात जखमी झाली. आजीच्या कडेवर असलेली जखमी महिलेची मुलगी सुदैवाने बचावली. सेंट्रल एव्हेन्यूवर रविवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.अमी जय जोशी (वय २४) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. हिवरीनगर, भीम चौक नंदनवन येथे राहणा-या अमी जोशी, दीड वर्षीय मिरा नामक मुलगी आणि सासू साधना जोशी यांच्यासह अ‍ॅक्टिव्हाने (एमएच ४९/ क्यू ०५३७) गांधीबागकडे जात होत्या. सेंट्रल एव्हेन्यूवरील छापरू नगर-आंबेडकर चौकाजवळच्या हनीशीला अपार्टमेंट समोर अचानक मेट्रोच्या कामासाठी लावलेला एक लोखंडी कॉर्टर पिल्लर जोशी यांच्या दुचाकीवर आदळला. त्यामुळे डोक्याला दुखापत होऊन अमी जोशी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मागे बसलेल्या सासू साधना यांनाही मार लागला.सुदैवाने आजीच्या कडेवर असलेल्या चिमुकल्या मिराला मात्र दुखापत झाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. या तिघींनाही तातडीने बाजुच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जमाव वाढत असल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे तणावात मोठी भर पडली. वाहतूक पोलीस आणि लकडगंज पोलिसांचा ताफा पोहचला. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले.वाहतूकही सुरळीत करण्यात आली. हा अपघात मेट्रोच्या अधिकारी आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप करून नागरिकांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर रुग्णालयात साधना जोशी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लकडगंजचे सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. अ‍ॅन्थोनी यांनी मेट्रोचे काम करणारे कमलकिशोर सुरेंद्रकुमार शर्मा (वय ४८, रा. सुभाषनगर नजिमाबाद, जि. बीजनौर), सहायक अभियंता निलेश पराते, नरेंद्र कुमार आणि शिशिर सिंग यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Accidentअपघात