मुंबई : मेट्रोत यापुढे ‘हीरो’पंतींना गौरविण्यात येणार आहे. मेट्रोतून प्रवास करताना कर्तव्य बजावणा:या प्रवाशाला मेट्रो प्रशासनाकडून गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मेट्रो हीरो’ या नावाने मोहीम सुरू करून त्या प्रवाशाला पदक देण्यात येईल, असे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून सांगण्यात आले. 19 जुलैपासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून, एका प्रवाशाला गौरविण्यातही आले आहे.
8 जून रोजी घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू झाली. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर झाला आहे. मेट्रो सुरू झाल्यावर सुरुवातीला रोजची प्रवाशांची संख्या 2 लाख 4क् हजार एवढी होती. त्यानंतरच्या काही दिवसांत हा आकडा वाढून 3 लाख झाला, तर शनिवार आणि रविवारी येणा:या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने प्रवाशांचा आकडा आणखी वाढून तो 5 लाख एवढा झाला. मेट्रोतून प्रवास करताना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मेट्रो प्रशासनाने आणखी एक नवी शक्कल लढविली आहे. मेट्रो ही आपल्यासाठी एक चांगली सेवा असून त्याची सुरक्षा, नैतिक मूल्ये आणि नियम ही आपली जबाबदारी असल्याची जाणीव प्रवाशांना झाली पाहिजे, या उद्दिष्टाने ‘मेट्रो हीरो’ हे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे मेट्रोच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. प्रवासात प्रसंगावधान राखून एखाद्याचे प्राण वाचवणो, छेडछाड रोखणो, संशयित व्यक्तीला पकडून देणो, अस्वच्छता करणा:या अन्य प्रवाशाला वेळीच रोखून ते मेट्रो प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणो, इत्यादी घटनेत चांगली कामगिरी बजावणा:या प्रवाशाला पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. मागील आठवडय़ातील शनिवारपासून हे अभियान सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
अमित वेंगुर्लेकर ‘मेट्रो हीरो’
अमित वेंगुर्लेकर हा मेट्रोचा पहिला ‘मेट्रो हीरो’ ठरला. शनिवारी अमित अंधेरी-घाटकोपर दरम्यान प्रवास करीत असताना एका महिला प्रवाशाचा एक जण चोरून फोटो काढत होता. ही बाब पाहताच अमितने प्रवाशाला घाटकोपर स्थानकातील सुरक्षारक्षकांकडे दिले. त्याबद्दल मेट्रो प्रशासनाने अमितला पदक देऊन गौरविले.