शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

म्हाडाची बनावट वेबसाइट अखेर झाली 'लॉक' सायबर पोलिसांची कारवाई; सावधगिरीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 7:21 AM

घरांची लॉटरी जाहीर केलेली असतानाच बनावट वेबसाइटद्वारे घरखरेदीदारांना फसविण्याचा प्रकार झाला होता उघड

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाने २ हजार ३० घरांची लॉटरी जाहीर केलेली असतानाच म्हाडाच्या बनावट वेबसाइटद्वारे घरखरेदीदारांना फसविण्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानुसार वांद्रे-कुर्ला संकुलातील सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत ही वेबसाईट आता लॉक केली आहे. या प्रकरणी सायबर सेलकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली.

म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत वेबसाइटशी नामसाधर्म्य असणारी mhada.org या नावाने बनावट वेबसाइट सायबर चोरांनी तयार केली होती. याद्वारे काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. बनावट वेबसाइटचे होम पेज व इतर रचना म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटसारखीच दर्शविण्यात आली होती. मात्र, या बनावट वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया न राबविता थेट पेमेंटचा पर्याय देण्यात आला होता. त्याद्वारे काही खरेदीदारांकडून ५० हजार रक्कम ऑनलाइन भरून घेण्यात आली आणि त्यांना बनावट पावतीही उपलब्ध करून दिल्याचा प्रकार घडला होता.

या पार्श्वभूमीवर म्हाडाने घर खरेदीदारांसह सर्वांना या बनावटगिरीबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. अर्जदारांनी कुठल्याही अनधिकृत वेबसाईटवरील लॉटरीत सहभाग घेऊ नये. तेथे कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये, आर्थिक व्यवहार करू नये, असे जाहीर आवाहन त्यांनी केले आहे. घरांच्या विक्रीकरिता कोणत्याही समाजमाध्यमांची त्रयस्थांची, संस्थांची वा इतर मध्यस्थांची नेमणूक करण्यात आलेली नाही.https://housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अनामत रकमेची मागणी केली जात नाही. प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्यरत असल्याने म्हाडा कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून पैशांची मागणी केली जात नाही, असेही म्हाडा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी होते अर्ज प्रक्रिया...

  • म्हाडाच्या सोडत प्रणालीमध्ये अर्जदारांची नोंदणी प्रक्रिया झाल्यावर त्यांचे कायमस्वरूपी प्रोफाइल तयार होते.
  • प्रोफाइलमध्ये अर्जदार आपली कागदपत्रे सादर करतील.
  • कागदपत्रांची प्रणालीद्वारे पडताळणी केली जाते.
  • पात्र कागदपत्रांनुसार अर्जदाराची पात्रता निश्चिती केली जाते. अर्जदार सोडतीसाठी अर्ज करू शकतील.
  • अर्ज भरल्यानंतरच अनामत रकमेचा भरणा करण्याबाबतचा पर्याय या प्रणालीमध्ये उपलब्ध होतो.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमmhadaम्हाडाPoliceपोलिसfraudधोकेबाजी