मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून साडेचार हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ ८ मार्चपासून होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, सर्वसमावेशक योजना आणि कोकण मंडळ योजनेचा यंदाच्या लॉटरीत समावेश आहे. मे महिन्यात घरांची लॉटरी काढली जाणार असून, घरांच्या किमती १३ लाखांपासून सुरू होत असून, घरांच्या क्षेत्रफळानुसार घरांच्या किमतीमध्ये बदल होत आहेत. १३ लाखांपासून सुरू झालेल्या किमती २५ लाखांपर्यंत असणार आहेत.
१० एप्रिलपर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. १२ एप्रिलपर्यंत अनामत रक्कम भरता येईल. २८ एप्रिलपर्यंत हरकती मांडता येतील. तर १० मे रोजी सकाळी १० वाजता ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात घरांची लॉटरी काढली जाईल. दरम्यान, विखुरलेल्या घरांची लॉटरी काढली जाणार असून, त्याचे वेळापत्रक म्हाडाने स्वतंत्र काढले आहे. सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत १४५६ घरांचा समावेश आहे. ही घरे ठाणे, पालघर, कल्याण, वसई, नवी मुंबई, सानपाडा आणि विरार येथे आहेत. म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेत घरे आणि भूखंडाचा समावेश आहे. रायगड, कल्याण, पेण, अंबरनाथ, बदलापूर, सिंधुदुर्गमध्ये घरे, भूखंड असून, त्याचा आकडा १६६ आहे. कोकण गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत २०४८ विखुरलेली घरे विरार येथे आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेत एकूण घरेकल्याण येथील शिरढोण आणि खोणी, ठाणे येथील गोठेघर, विरार येथील बोळींज येथे ही घरे आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना (कौटुंबिक उत्पन्न)अत्यल्प उत्पन्न गट - ३ लाखांपर्यंतउत्पन्न गट - उत्पन्न मर्यादा (मुंबई, पुणे, नागपूर, १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था) / उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था) / चटई क्षेत्रअत्यल्प गट - ६ लाख / ४ लाख ५० हजार / ३० चौमीटरअल्प गट - ९ लाख / ७ लाख ५० हजार / ६० चौमीटरमध्यम गट - १२ लाख / १२ लाख / १६० चौमीटरउच्च गट - कमाल मर्यादा नाही / कमाल मर्यादा नाही / २०० चौमीटर
माहिती पुस्तिका व अर्जाचा नमुना ८ मार्चपासून दुपारी १२ पासून संकेतस्थळावर उपलब्ध होईल.