मुंबई : स्थालांतरित आदेश, ताबा पावती देण्यासाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या म्हाडाच्या इस्टेट मॅनेजरला (मिळकत व्यवस्थापक) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. रामकृष्ण दमडोजी आत्राम असे आरोपीचे नाव असून, म्हाडाच्या मुख्य कार्यालयातच एसीबीने ही कारवाई केली.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादीचे विक्रोळीच्या कन्नमवारनगरात घर होते. ते फिर्यादीच्या पत्नीच्या नावे होते. गेल्या वर्षी जून महिन्यात म्हाडाने फिर्यादीला विक्रोळीहून मुलुंड, गव्हाणपाडा येथील संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले. तेव्हा स्थलांतरण आदेश, ताबा पावती देण्यात आली होती. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी फिर्यादी काळाचौकी येथील म्हाडाच्या कार्यालयात फेऱ्या मारत होते. तेथील वरिष्ठ लिपिक कुरूमय्या पुजारी यांनी फिर्यादीला वांद्र्याच्या मुख्य कार्यालयात अर्ज करण्यास सांगितले. अर्ज केल्यानंतर फिर्यादीने पुजारीची भेट घेतली. तेव्हा पुजारीने कागदपत्रांसाठी १ लाख रुपयांची लाच फिर्यादीकडे मागितली. तडजोडीअंती ५० हजार स्वीकारण्याचे कबूल केले होते. (प्रतिनिधी)
म्हाडाचा अधिकारी गजाआड
By admin | Published: July 02, 2014 4:39 AM