शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

म्हाडा बांधणार १२ हजार ७२४ घरे, मुंबई-पुण्यासह अनेक ठिकाणी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2023 5:56 AM

यंदा म्हाडाच्या १० हजार १८६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावणाऱ्या म्हाडाच्या यंदाच्या दहा हजार १८६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आता म्हाडाच्यामुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती मंडळांतर्फे येत्या आर्थिक वर्षात एकूण १२ हजार ७२४ घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात पाच हजार ८०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत दोन हजार १५२ घरांची उभारणी केली जाणार असून, त्यासाठी ३६६४.१८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीसाठी आणखी घरे उपलब्ध होणार असून, सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.

कोकणात साडेपाच हजार घरे

कोकण मंडळांतर्गत ५६१४ घरे बांधली जातील. यासाठी ७४१.३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विरार बोळींज गृहनिर्माण प्रकल्पासाठी १० कोटी, बाळकुम ठाणे गृहनिर्माण प्रकल्पासाठी ३३ कोटी, माजिवडा ठाणे संयुक्त भागीदारी प्रकल्पासाठी ३५ कोटी, मीरारोड टर्न की प्रकल्पासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

किती कोटींचा अर्थसंकल्प

  • २०२२-२०२३ - ६९३३.८२ कोटी
  • २०२३-२०२४ - १०,१८६.७३ कोटी
  • २०२३-२०२४च्या अर्थसंकल्पात शून्य तूट

मुंबईतील कोणत्या प्रकल्पासाठी किती तरतूद?

  • बीडीडी चाळींचा पुनर्विकास योजना- २२८५ कोटी
  • कन्नमवार नगर विक्रोळी येथील योजना- २१३.२३ कोटी
  • कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजना- १०० कोटी
  • बॉम्बे डाइंग मिल वडाळा योजना- ३० कोटी
  • ॲन्टॉप हिल वडाळा येथील गृहनिर्माण योजना- २४ कोटी
  • मागाठाणे बोरिवली येथील योजना- ५० कोटी
  • खडकपाडा दिंडोशी येथील गृहनिर्माण योजना- १८ कोटी
  • पहाडी गोरेगाव येथील गृहनिर्माण योजना- १०० कोटी
  • गोरेगाव सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) प्रकल्प- ३०० कोटी
  • धारावी पुनर्विकास प्रकल्प टप्पा १ ब- ५९ कोटी
  • गोरेगाव मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प- १० कोटी
  • पोलिस गृहनिर्माण प्रकल्प वसाहतीच्या पुनर्विकास- १०० कोटी

मंडळ     घरे     कोटी 

पुणे     ८६२     ५४०.७० नागपूर     १४१७     ४१७.५५ औरंगाबाद     १४९७     २१२.०८ नाशिक     ७४९     ७७.३२ अमरावती     ४३३     १४६.२४ 

टॅग्स :mhadaम्हाडाMumbaiमुंबईPuneपुणेAurangabadऔरंगाबाद