विरार, ठाणो येथे देणार दोन हजार घरे
मुंबई : पुढच्या वर्षी 31 मे रोजी म्हाडाची 3 हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. विशेष म्हणजे सध्यापेक्षा त्याची किंमत 5क् हजार ते दीड लाखाने कमी असेल.
येत्या सोडतीमध्ये मुंबईत 1 हजार तर विरार - बोळिंज, बाळकुममधील 2 हजार घरांचा समावेश असून, या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गवई यांनी दिली.
मुंबई व कोकण मंडळांच्या वतीने 2,641 घरांसाठी वांद्रेतील रंगशारदा सभागृहात लॉटरी काढण्यात आली. या वेळी त्यांनी भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, मुंबईतील जुन्या व धोकादायक ट्रान्ङिास्ट इमारती पाडून तिथे पक्की घरे बांधली जाणार आहेत. त्याशिवाय एसआरए योजनेंतर्गत म्हाडाच्या जागेतील 9 प्रकल्प प्राधिकरण स्वत: राबविणार आहे. यातून सुमारे 1 हजार घरे, त्याचप्रमाणो कोकण मंडळाच्या अखत्यारीतील विरार-बोळिंजमधील गृहप्रकल्पातील, ठाण्यातील बाळकूम, चितळसर येथे 2 हजार घरे उपलब्ध होणार आहेत. प्राधिकरणाच्या येत्या बैठकीत त्याबाबत ठराव मांडला जाणार आहे. (प्रतिनिधी)
5 वर्षात 1क् हजार घरे
गेल्या वर्षात म्हाडाने पूर्ण राज्यात 5क्-6क् हेक्टर खासगी भूखंड विकत घेतले असून त्यातून किमान 1क् हजार घरांची निर्मिती केली जाईल. आगामी 5 वर्षात सुमारे एक लाख घरे बांधण्याचे प्रय} आहेत.