वरपगाव : कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा येथील ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत, अनेकांचे बाबा, गुरू अशा श्रद्धास्थानी असलेले साबीरभाई यांच्या निधनाने येथे शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांना अखेरचा जय महाराष्ट्र करण्यासाठी गर्दी केली होती. या वेळी अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत.
कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा या तीन गावांच्या जीवावर साबीर शेख तीन वेळा अंबरनाथ मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा या गावांवर खूप जीव होता. हरिभाऊ म्हात्रे, डॉ. भगवान भोईर, नारायण पावशे, वसंत सुरोशे, प्रभाकर पावशे, इंदुताई कुर्ले यांच्यासारख्या सच्च्या शिवसैनिकांमुळे ते 15 वर्षे आमदार राहिले. तसेच 197क् पासून ते शिवसेनेत कार्यरत होते. शहरप्रमुख ते जिल्हाप्रमुखर्पयत विविध पदे त्यांनी भूषविली. 1994-95 मध्ये म्हारळ, वरप, कांबा यासह 3क् गावांना उल्हासनगर पालिकेतून वगळण्यासाठी मोर्चे-आंदोलने केली. त्याला यश आल्याने ग्रामस्थांनी त्यांना डोक्यावर घेतले.
या काळात या गावांतील ग्रामस्थांसाठी त्यांनी व्यायामशाळा बांधून रवी भोईर, राजेश भोईर, निलेश कडू असे पहिलवान घडवले. त्यामुळेच साबीरभाई यांच्याविषयी या तिन्ही गावांत खूप आदर होता.
या प्रसंगी अंबरनाथ भाजपाचे विजय खरे, अंबरनाथ नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, भिवंडी तालुकाप्रमुख विश्वास थळे, कल्याण उपशाखाप्रमुख किशोर सावंत, विक्रोळीचे त्यांचे भाचे अब्दुल समद शेख, माजी विद्यार्थी संघटनेचे सूर्यकांत गांधी, नारायणगावचे रत्नाकर सुगंध आदी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. (वार्ताहर)
कोनगावात
शोककळा
चिकणघर : रात्रीपासून गावात चुली पेटल्या नाहीत. शिवसेना नेते तथा माजी कामगारमंत्री साबीर शेख यांच्या निधनाचे वृत्त येताच कोनगाव शोकसागरात बुडाले. गावक:यांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठा, दुकाने बंद ठेवून शेख यांना आदरांजली वाहिली.
उद्धव किंवा आदित्य ठाकरे यायला हवे होते
साबीर शेख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर सैनिक होते. त्यांनीच साबीरभाईंना शिवभक्त ही पदवी बहाल केली होती. शिवसेनेतील मुस्लिम समाजाचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांनी अनेक शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख घडविले होते. अशा सच्च्या शिवसैनिकाच्या अंत्ययात्रेला उद्धव किंवा आदित्य ठाकरे यांनी यायला हवे होते, अशी भावना शिवसैनिकांमधून व्यक्त केली जात होती.
जिल्ह्यातील हिंदूंचे नेतृत्व करणारा एकमेव मुस्लिम नेता. महाराष्ट्र व देशावर निष्ठा असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे साबीरभाई शेख. तसेच संकटाला तोंड देऊन प्रत्येक काम पूर्णत्वाला नेणारा हाडाचा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला. त्यांना श्रद्धांजली.
- गणोश नाईक, माजी पालकमंत्री
शिवसेनेचा खंदा सहकारी गेल्याचे आम्हाला दु:ख आहे. दादा कोंडके यांच्याबरोबर नेहमी साबीरभाई असायचे. ते त्यांचे वेगळे पैलू होते. शेवटर्पयत त्यांनी शिवसैनिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. माझा एक साथीदार गेला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
- दिवाकर रावते, शिवसेना नेते
सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले साबीरभाई शेख यांच्या निधनाने शिवसेनेचे नाहीतर महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. ते देशाभिमानी होते. त्यांचा आदर्श तरुणांना नेहमी प्रेरणादायी ठरेल. - कपिल पाटील, खासदार
साबीरभाई शेख हे खाटीक समाजाचे असल्याने त्यांच्या कुटुंबाशी आमची जवळीक होती. त्यांचे वडील हानीफकाका यांच्या घरात माङो बालपण गेले. ते नारायणगावचे तर आम्ही घोडेगावचे आहोत. त्यांचे भाषण म्हणजे प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचे शब्द होते. समस्त खाटीक समाज व शिवसेनेतर्फे त्यांना श्रद्धांजली.
- वैजयंती घोलप,
माजी महापौर कडोंमपा
परिसरातील सर्वपक्षीय समितीचे चिटणीस म्हणून त्यांचे नेहमी मार्गदर्शन लाभायचे. राजकारणातील मतभिन्नता असताना सर्वामध्ये त्यांनी प्रेम बिंबविले. सर्व समाजांत दिलदार व माणुसकीचे प्रतीक असलेले साबीरभाई आपल्यात नाही, याचे दु:ख वाटते.
- रामनाथ मोते, आमदार
लोकांमध्ये शिवसेनेतील गैरसमज दूर करण्याचे प्रमुख काम त्यांनी शेवटच्या क्षणार्पयत केले. शिवसेनेवर निष्ठा होती. कामगारांविषयी काहीतरी वेगळे करण्याची त्यांची इच्छा होती. महाराष्ट्रातील शिवसेना त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे.
- कृष्णकांत कोंडलेकर,
माजी चिटणीस कामगार सेना
बाळासाहेबांच्या जवळचे असल्याने त्यांना नेते म्हणून महाराष्ट्र ओळखत होता. निष्ठावंत व कडवट शिवसैनिक कसा असावा, त्याचे साबीरबाई शेख हे जिवंत उदाहरण़ जन्माने मुस्लिम असतानाही राष्ट्रभक्त, देशभक्ती व देशप्रेम काठोकाठ भरलेले. साबीरभाईंच्या रूपाने बाळासाहेबांना अनमोल हिरा मिळाला होता. मंत्री असताना कधी पैसा जमा न करता त्यांनी लोकांचे काम करीत माणसे जमा केली. जिल्हा फिरून त्यांनी शिवसेना घराघरांत पोहोचविली. सीमा आंदोलनासाठी रेल्वेने प्रवासात असताना त्यांनी प्रवास संपेर्पयत शिवचरित्र आमच्यासमोर मांडले. साधी राहणी व कार्यकर्ता म्हणून ते वागले व जगले. त्यांना शिवसेनेतर्फे व जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली.
- एकनाथ शिंदे,
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख